उडी बेलाबाय येथे नादुरुस्त अवस्थेत पडलेला मुरगाव पालिकेचा कॉम्पॅक्टर. Dainik Gomantak
गोवा

दाभोळी पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने कचरा वाहू वहाने धूळ खात पडून

पालिका गॅरेजमध्ये कचरा (Garbage) वाहू दोन मोबाइल व्हॅन (Mobile van) गेले महिनाभर बंद अवस्थेत आहेत. सदर व्हॅन टायर नसल्याने ते तसेच धूळ खात पडून आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: पालिका तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने पालिकेची वाहने दुरुस्त करण्यासाठी दाभोळी पालिकेजवळ पैसे नसल्याने कचरा (Garbage) वाहू कॉम्पॅक्टर उडी बेलाबाय येथे गेले दहा दिवस नादुरुस्त अवस्थेत पडून. तसेच मोबाइल व्हॅन टायर (Mobile van) नसल्याने पालिका गॅरेजमध्ये महिनाभर तशाच पडून आहेत.

मुरगाव पालिका तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने पालिकेला कर्मचाऱ्यांचा पगार घालण्यास तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटला देण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्याचे वेतनाविना हाल झाले. दरम्यान आता याचा परिणाम नादुरुस्त झालेली वाहने दुरुस्त करण्यास पालिकेजवळ पैसे नसल्याने पालिकेचा कचरा वाहू कॉम्पॅक्टर गेले दहा दिवस उडी बेलाबाय येथे नादुरुस्त झाल्याने तसाच पडून आहे. सदर कॉम्पॅक्टर रस्त्याच्या एका बाजूला उभा करून ठेवण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कचरा वाहू कॉम्पॅक्टरच्या स्टाटर मध्ये बिघाड झाली असून त्याची किंमत जेमतेम तीन हजार रुपये आहे. तो स्टार्टर घालायला पालिके जवळ पैसे नाही. त्यामुळे गेले दहा दिवस सदर कॉम्पॅक्टर एकाच ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत धूळ खात पडलेला आहे.

याव्यतिरिक्त पालिका गॅरेजमध्ये कचरा वाहू दोन मोबाइल व्हॅन गेले महिनाभर बंद अवस्थेत आहेत. सदर व्हॅन टायर नसल्याने ते तसेच धूळ खात पडून आहे. पालिके जवळ सध्या या वहानाना टायर घालण्यासाठी पैसे नसल्याचे सांगण्यात आले. सदर वाहने कित्येक दिवस बंद असल्याने त्याचा दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च वाढू शकतो. कारण सध्या सदर वाहने पूर्णपणे बंद आहे. ती वहाने गंजून जाऊ शकतात. तसेच इंजिन बंद असल्याने इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. हल्लीच चिखली पंचायतीतर्फे मुरगाव पालिकेला कचरा वाहू कॉम्पॅक्टर बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या वाहनाकडे दुर्लक्ष करण्यात येते काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सदर वाहने नादुरुस्त असल्याने कचरा उचल व्यवस्थित होत नसल्याने कचरा समस्या जटील बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT