Migration of Goans abroad Dainik Gomantak
गोवा

Migration of Goans abroad: तब्बल 'एवढ्या' गोमंतकीयांचा मायभूमीला रामराम; गेल्या आठ वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

गत ८ वर्षांतील आकडेवारी: नव्या देशाचे नागरिकत्व, केला घरोबा

गोमन्तक डिजिटल टीम

Migration of Goans abroad रोजगार संधींचा अभाव, आर्थिक तफावत, पाश्चिमात्य जीवनशैलीचे आकर्षण यामुळे दरवर्षी हजारो गोमंतकीय मायभूमीला सोडून कायमचे परदेशात स्थिरावत आहेत. गेल्या आठ वर्षांत २३,२०६ जणांनी गोव्याला रामराम ठोकून नव्या देशाचे नागरिकत्व पत्करून तेथे घरोबा केला आहे.

विदेश व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१५ ते डिसेंबर २०२२ पर्यंत २३ हजार २०६ जणांनी दुसऱ्या देशांचे नागरिकत्व घेतल्यानंतर भारतीय पासपोर्ट परत केला आहे. २०१५ ते २०१८ या चार वर्षांमध्ये सर्वाधिक लोकांनी भारतीय पासपोर्ट परत केला आहे.

या चार वर्षांच्या तुलनेत २०१६ मध्ये सर्वाधिक ४,१३९ लोकांनी गोवा सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेतले आहे. कोविडपूर्वी गोवा सोडून विदेशात स्थलांतरित होणाऱ्यांचा आकडा मोठा होता, पण २०२० मध्ये हा आकडा ९३० इतका कमी झाला. २०२१ मध्ये गोव्यातील २,८३५ जणांनी भारतीय पासपोर्ट परत केला, तर २०२२ मध्ये १,२६५ जणांनी भारतीय पासपोर्ट परत केले.

दुहेरी नागरिकत्वाचा विषय ऐरणीवर

राज्यात पोर्तुगीज नागरिकत्व असलेल्यांची संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. याबाबत अनेकवेळा उलटसुलट तक्रारी आणि चर्चा झाल्या आहेत.

पोर्तुगालसह अन्य देशांचे नागरिकत्व घेऊनही ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे, अशा नागरिकांची चौकशी करून ती माहिती सादर करण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

त्याचे काम अजूनही सुरूच आहे. त्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो.

मालमत्तेचा विषय गंभीर

विदेशात स्थिरावताना बहुतांश गोमंतकीय आपली गोव्यातील मालमत्ता तशीच ठेवतात. मात्र, त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या मालमत्ता परस्पर बळकावण्याचे आणि विक्री करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे १०० पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. सध्या या प्रकरणांचा तपास सुरू असून यात अनेक जणांना अटकही झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT