Monsoon Update in Goa File Photo
गोवा

Goa Monsoon Update: मॉन्सून आला, पडझडीला सुरुवात; अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी हाताळल्या 20 घटना

शनिवारी राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली.

दैनिक गोमन्तक

Monsoon Update in Goa: शनिवारी राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. गाड्यांवर आणि रस्त्यांवर झाडे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यानंतर अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी रस्त्यावर आणि घरावर झाडे पडण्याच्या जवळपास 20 घटना हाताळल्या असल्याचे सांगितले.

यापैकी बहुतेक घटना फोंडा तालुक्यात घडल्या आहेत. झाडांमुळे विद्युत सुविधांचेही नुकसान झाले, ज्यामुळे बऱ्याच वेळ परिसरातील काही भागातील वीजपुरवठाखंडित झाला होता.

फोंड्यात पावसाने दाणादाण उडवल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील सखल भागात पाणी साचले आहे. नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले.

फर्मागुडी येथे पार्किंगमधील एका कारवर गुलमोहराचे झाड कोसळले. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या वेळी गाडीत किंवा या परिसरात कुणी नव्हते त्यामुळे जीवीतहानी झालेली नाही.

काणकोण येथील रस्त्यावर मोठ झाड कोसळल्याने दोन्ही बाजूचा मार्गावरील वाहतूक जवळपास 2 तास ठप्प होती. याबाबत अग्निशमन अधिकारी रवींद्रनाथ पेडणेकर यांनी सांगितले की, सकाळी 11 वाजता घटनेची माहिती मिळताच उपअधिकारी उल्हास गावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावरील झाड हटवले.

यामुळे पोळे येथील विजेचा खांब आणि करमल घाटावरील वीजवाहिनीचेही नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्ग पूर्ववत करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT