Mormugao Port Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; मुरगाव बंदरावरील सर्व कामकाज स्थगित

Cyclonic circulation Goa & North Karnataka coast: बंदराला धोका पोहोचणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

Pramod Yadav

मुरगाव: गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याच्या वतीने दोन दिवसांसाठी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुरगाव बंदरावरील सर्व कामकाज स्थगित करण्यात आले आहे. पाण्यातील बार्जना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मान्सूनपूर्व पावसाने गेल्या दोन दिवसांपासून गोव्याला झोडपून काढले आहे. पुढील दोन ते तीन दिवस देखील राज्यात मुसळधारेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात कामी दाबाचा पट्टा तयार झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून मुरगाव बंदरावरील सर्व कामकाज स्थगित करण्यात आले आहे. सर्व बार्जना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, बंदराला धोका पोहोचणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात (उत्तर, दक्षिण) आज देखील (गुरुवारी) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या काळात ५० ते ६० किलो मीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हा वेग ७० किलो मीटर प्रतितास होण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.

गोव्यात गेल्या २४ तासांत दाबोळी - १४२.२ मी.मी, मडगाव - १४० मी. मी, मुरगाव - १२४.२ मी. मी, धारबांदोडा येथे १२२.५ मी. मी पावसाची नोंद झाली. तर, केपे तालुक्यात १००.४ मी. मी पावसाची नोंद झालीय. राज्यात या संपूर्ण आठवड्यात पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

SCROLL FOR NEXT