Dudhsagar Taxi Services Dainik Gomanatk
गोवा

Dudhsagar Waterfall: पर्यटकांसाठी खूशखबर!! सोमवारपासून सुरु होणार दूधसागरसाठी टॅक्सी सेवा

Dudhsagar Taxi Services: दूधसागर धबधब्यापर्यंत जाणारी टॅक्सी सेवा सोमवारपासून सुरु होईल, गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधबा आता लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधबा आता लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे आणि दूधसागर धबधब्यापर्यंत जाणारी टॅक्सी सेवा सोमवारपासून सुरु होईल. दूधसागर पर्यटनसंदर्भात एक बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर तसेच वन विभाग आणि पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते आणि म्हणूनच सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन इथे टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यंदा राज्यात बराच पाऊस झाला, आजही अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण कायम आहे. पावसाच्या अतिरेकामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्व्यवस्था झालीये आणि यामुळे वाढणारे अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवरचे खड्डे बुजवणे तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी या कामाचा आढावा घेतला असून वन अधिकाऱ्यांकडून देखील सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आलीये.

राज्यात पर्यटनाचा हंगाम सुरु होऊन देखील पाऊस अजूनही मागे फिरायचं नाव घेत नाही. यापूर्वी अनेकवेळा दूधसागर धबधब्यावर गेलेल्या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना आखण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक आहेतच मात्र या ठिकाणी अनेक सूचनाफलक लावण्यात यावेत तसेच संकेतांच्या स्थितीची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT