Goa Degree Admission Schedule - 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Degree Admission: पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट आली रे; इंजिनीअरिंग, फार्मसी प्रवेशाबाबत महत्वाची बातमी

बारावीनंतर अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Goa Degree Admission Schedule - 2023: बारावीनंतर अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी DTE च्या संकेतस्थळावर पाहता येईल. असे तंत्रशिक्षण संचालनायाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयच्या संकेतस्थळावर 20 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता प्रसिद्ध केली जाणार असून, 21 जून रोजी सायंकाळी पाच वाजता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

प्रवेशाच्या फेरीला गुरूवारपासून (22 जून) सुरूवात होईल तर, 28 जून प्रवेश घेण्याचा अंतिम दिवस असेल. असे तंत्रशिक्षण संचालनालयच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

अभ्यासक्रम, विभाग आणि गुणवत्ता यादीतील क्रमांक याबाबत सविस्तर माहिती तंत्रशिक्षण संचालनालयच्या www.dte.goa.goa.in या संकेतस्थळावर 20 जूनपासून पाहायला मिळेल. नीट आधारीत प्रवेशाबाबतची सूचना नंतर प्रसिद्ध केली जाईल असे पत्रकात म्हटले आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्यासाठी स्वत: उपस्थित राहवे असेही संचालनालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT