अडीच वर्षातील तब्बल 15 कोटींचा ड्रग्ज जप्त Dainik Gomantak
गोवा

गोव्यात गेल्या अडीच वर्षात 15 कोटींचा ड्रग्ज जप्त

अडीच वर्षात गोवा पोलिस (Goa Police) खात्याच्या विविध विभागाने सुमारे 15 कोटी रुपयांच अंमलीपदार्थ (Drugs) जप्त केले आहे.

Vilas Mahadik

पणजी: गेल्या अडीच वर्षात पोलिस खात्याच्या विविध विभागाने सुमारे 15 कोटी रुपयांचा अंमलीपदार्थ जप्त केला आहे. 424 अंमलीपदार्थाचे गुन्हे नोंद झाले असून 471 जणांना अटक झाली आहे. त्यामध्ये 368 देशी व 103 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या काळात 285 किलो विविध प्रकारचा ड्रग्ज पोलिसांनी संशयितांकडून जप्त केला आहे त्यामध्ये गांजाचा अधिक समावेश आहे.

2019 ते 2021 या काळात उत्तर गोवा, दक्षिण गोवा, अंमलीपदार्थविरोधी कक्ष व क्राईम ब्रँच या विभागानी राज्यातील ड्रग्ज दलाल तसेच विक्रेत्यांचा कणा मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे. 2021 मध्ये राज्यात आतापर्यंत 56 प्रकरणे नोंद झाली असून 57 नागरिकांना अटक झाली आहे. त्यामध्ये 49 देशी व 8 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. 50 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 1 कोटी 17 लाख 50 हजार 100 आहे. 2020 मध्ये 148 अंमलीपदार्थाची प्रकरणे नोंद होऊन 172 जणांना अटक झाली होती. त्यात 136 देशी व 36 विदेशी नागरिक आहेत. 150 किलो ड्रग्ज जप्त केला असून, त्याची किंमत 7 कोटी 8 लाख 52 हजार 50 रुपये आहे.

2019 ते 2021 सालातउत्तर गोव्यात प्रकरणे जास्त

2019 ते 2021 पर्यंत उत्तर गोव्यात सर्वाधिक अंमलीपदार्थाची प्रकरणे नोंद झाली आहेत. मध्ये 200 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली; मात्र 2020 हे प्रमाण कमी होऊन 150 वर आले. यावर्षी राज्यात कोरोना महामारीमुळे टाळेबंदी झाल्याने पर्यटक गोव्यात येऊ शकले नव्हते तसेच पर्यटन व्यवसाय बंद असल्याने अंमलीपदार्थाचा व्यवसाय थंडाच राहिला. यावर्षीही आतापर्यंत पन्नासच्या आसापास प्रकरणे नोंद झाली आहे. पोलिस खात्याच्या विविध विभागामार्फत ड्रग्ज दलाल तसेच किरकोळ विक्रेत्यांवर नजर असल्याने हे प्रमाण घटले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अडीच वर्षातील पोलिस विभागांची कामगिरी

विभाग प्रकरणे अटक ड्रग्ज किंमत

  • उत्तर गोवा 188 218 18 किलो 8 कोटी

  • दक्षिण गोवा 129 136 33 किलो 58 लाख

  • एएनसी 64 69 78 किलो 5.5 कोटी

  • क्राईम ब्रँच 39 46 50 किलो 93 लाख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT