Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कळंगुट, असोळणा येथे 12.20 लाखांचे ड्रग्ज जप्त

गुन्हे शाखेची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने कळंगुट व असोळणा येथे दोन वेगवेगळ्या घातलेल्या छाप्यामध्ये विविध प्रकारचा सुमारे १२.२० लाखांचा ड्रग्ज जप्त केला. या कारवाईवेळी कळंगुट येथे मलिक सय्यद (२८) याला तर असोळणा येथे बेनेडिटो फर्नांडिस (५१ वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली. या शाखेने केलेली ही या वर्षातील पाचवी कारवाई आहे. पोलिसांनी ड्रग्जविरोधी मोहीम अधिक सक्रिय केली आहे.

असोळणा येथील एका घरावर छापा टाकून पोलिस पथकाने सुमारे ११.४५ लाखांचे ड्रग्ज जप्त केले त्यामध्ये ५.४५२ किलो गांजाची फळे आलेली रोपटी, ६३६ ग्रॅम हशिश तसेच रोख रुपये २००० संशयित बेनेडिटो फर्नांडिस याच्या घरात सापडले. संशयित दक्षिण गोव्यात ड्रग्ज विक्रीमध्ये सक्रीय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक शेरीफ जॅकीस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास निरीक्षक नाथन आल्मेदा करत आहेत.

गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने काल रात्रीच कळंगुट येथून हडफडेकडे जाणाऱ्या डॉल्फिन सर्कलजवळ एका संशयास्पद फिरणाऱ्या युवकाला अटक केली. रात्री उशिरा या परिसरात तो काय करत असल्याचा प्रश्‍न या पथकाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी केला असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही त्यामुळे पोलिसांना त्याच्याबद्दल संशय आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता ४.१८ ग्रॅम कोकेन व २.५० एमडीएमए ड्रग्ज सापडला. या प्रकरणाचा तपास निरीक्षक लक्षी आमोणकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT