Haryana Police 
गोवा

Crime News: शेंगदाणे, पापडात लपवले चरस; कुरिअरद्वारे गोव्याला अमली पदार्थ पाठवण्याचा कट पोलिसांनी उधळला

Haryana Goa Crime News: आरोपींनी शेंगदाणे आणि पापडात चरस लपवून गोव्यात चरस पाठवण्याचा प्रयत्न केला होता.

Pramod Yadav

हरियाणा: पंचकुला येथून गोव्यात कुरिअरद्वारे चरस पाठवण्याचा कट रचणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. कुरिअर कंपनीच्या स्कॅनरमध्ये शेंगदाणे आणि पापडमध्ये 98 ग्रॅम आणि 14 मिलीग्राम चरस आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

आरोपींनी शेंगदाणे आणि पापडात चरस लपवून गोव्यात चरस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. कुरिअर कंपनीच्या स्कॅनरमध्ये ही बाब उघडकीस आली आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोव्यात चरस खरेदी कोण करणार होता त्या व्यक्तीलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पार्सलमध्ये शेंगदाणे आणि पापडाऐवजी चरस असल्याचे कुरिअर कंपनीच्या स्कॅनरमध्ये उघड झाले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि कुरिअरच्या पाकिटावर पाठवणाऱ्याचा मोबाईल क्रमांकही सापडला. तो लिफाफा गोव्याला पाठवला जाणार होता. आरोपींनी शेंगदाणे आणि पापडाच्या आत चरस लपवून ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी अमन रघुवंशी याला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी पंजाबमधील मोहाली येथे खाजगी नोकरी करतो, अशी माहिती पोलिसांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे. लवकरच गोव्यात कोण चरस खरेदी करणार होता त्या व्यक्तीलाही या प्रकरणात अटक करण्यात येणार असून या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT