Drug Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Cases: शिवोली येथे 25 लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त, हणजूण पोलिसांची मोठी कारवाई

270 ग्रॅम चरससह एकूण 4.7 लिटरच्या एकूण 475 केटामाइनच्या बाटल्या सापडल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drug Cases हणजूण पोलिसांनी गुजरातमधील एका आरोपीला अवैध ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार,शिवोली येथील व्हिलामध्ये एका आरोपीने ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी साठा केला होता.

त्याच्या घराची झडती घेण्यात आली असता घरात लपवून ठेवलेली 270 ग्रॅम चरससह एकूण 4.7 लिटरच्या एकूण 475 केटामाइनच्या बाटल्या सापडल्या.

जयराजसिंग किरीटसिंह चावडा, (वय 33 वर्ष रा. उत्तर अहमदाबाद, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो चौडी वाडा, शिवोली बारदेश गोवा येथे राहतो.

पोलिसांनी पंचनामा करून तत्काळ अमली पदार्थ जप्त करून ताब्यात घेतले. जयराजसिंग याच्या विरुद्ध NDPS कायद्याच्या 20(b) (ii) (B) ची नोंद करण्यात आली आहे.

छापा टाकणाऱ्या पथकात एलपीएसआय स्नेहा सावळ, पीसी रामदास हरमलकर, अर्जुन सावंत, सखाराम साळगावकर, पीएसआय साहिल वारंग यांचा समावेश होता.

एसपी निधिन वलसन आयपीएस यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षातील हा सर्वात मोठा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली हणजूण पोलीस पुढील तपास करत आहेत. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT