Goa Drugs  Dainik Gomantak
गोवा

Crime News : ड्रग्‍स व्‍यवसायात ‘भायलेच’ जास्त; निम्‍मे परप्रांतीय

Crime News : मागील वर्षी तब्‍बल २०१ आरोपींना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : मडगाव, कोविडनंतर गोव्‍यातील पर्यटनाला मागच्‍या वर्षी पहिल्‍यांदाच तेजी आलेली दिसत असतानाच गोव्‍यात ड्रग्‍स व्‍यावसायिकांचा सुळसुळाटही वाढल्‍याचे दिसून आले.

२०२३ या वर्षी गोव्‍यात तब्‍बल २०१ संशयितांना या व्‍यवसायात सामील असल्‍याच्‍या आरोपावरून अटक करण्‍यात आली. विशेष म्हणजे, त्‍यातील निम्‍म्‍यापेक्षा जास्‍त संशयित हे परप्रांतीय भारतीय असल्‍याचे दिसून आले आहे.

गोवा पोलिसांनी २०२३ साली राज्यभरात टाकलेल्या विविध छाप्यांमधून ८ कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मागील वर्षी एकूण २०१ संशयितांना अटक करण्‍यात आली असून त्‍यापैकी १२६ संशयित हे परप्रांतीय भारतीय असून ५१ जण गोमंतकीय आहेत.

अमली पदार्थ व्‍यवसायात सामील असल्‍याच्‍या आरोपाखाली गोवा पोलिसांनी मागच्‍या वर्षी २४ विदेशी नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांकडून वेगवेगळ्‍या प्रकारचे २०७ किलो अंमलीपदार्थ जप्‍त केले आहेत.

यात प्रामुख्‍याने गांजाचा समावेश असून हे प्रमाण ८० टक्‍के आहे. हल्‍लीच प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की,

जप्त केलेल्या ड्रग्सची उत्तर गोव्यातील कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये उभारलेल्या बायोमेडिकल वेस्ट फॅसिलिटीमध्ये विल्हेवाट लावण्यात आली.

मी स्वतः अशा प्रकारच्या विल्हेवाटीचे निरीक्षण केले होते. अमली पदार्थविरोधी सेलने राज्यात कार्यरत असलेल्या ड्रग्स तस्करांवर कडक नजर ठेवली आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

२४ विदेशींपैकी ७ नायजेरियन

मागच्‍या वर्षभरात ज्‍या २४ विदेशी नागरिकांना ड्रग्‍स व्‍यवसायाशी संबंध असल्‍याने अटक करण्‍यात आली, त्‍यापैकी ७ संशयित नायजेरियन होते.

त्‍यापाठोपाठ रशियन नागरिकांचा क्रमांक लागताे. ड्रग व्‍यवसायाशी संबंधित असलेल्‍या एकूण चार रशियन नागरिकांना अटक करण्‍यात आली आहे. युगांडाचे तीन, लायबेरिया, इटली आणि युकेचे प्रत्‍येकी दोन तर केनिया, फ्रान्‍स, नेपाळ आणि न्‍यू गिनी या देशातील प्रत्‍येकी एका संशयिताचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT