Drug Accused Arrested By Fatorda Police Dainik gomantak
गोवा

Drug Accused Arrested: युपीमधून ड्रग्ज द्यायला आला होता गोव्यात, अडकला फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात...

तो कोणाला ड्रग्स द्यायला आला होता त्याचा पोलिस तपास करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Drug Accused Arrested: राज्यातील वाढत्या ड्रग्जच्या घटना कमी करण्यासाठी गोवा पोलीस प्रशासन नेहमीच सतर्क असून ड्रग्ज माफियांवर आळा घालण्यासाठी ते सापळा रचत त्यांना ताब्यात घेत असतात. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा फातोर्डा पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे.

उत्तर प्रदेश येथील रामकृष्ण चौहान या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 किलो गांजा जप्त केला. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 3 लाख रुपये किंमत आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडल्याने यासंबंधी अधिक माहिती मिळू शकली नाही.

हा संशयित युपीमधून हा गांजा घेऊन आला होता. तो कोणाला ड्रग्स द्यायला आला होता त्याचा पोलिस तपास करत आहेत. रात्री उशीर त्याला फातोर्डा येथील बस स्थानकाजवळून ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, वास्कोमध्ये टाकलेल्या छाप्यात एक किलो अवैध गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वैधरीत्या ड्रग्ज पुरवठा होत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. दरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत 23 वर्षीय रोहन सरोज याला ताब्यात घेतले आहे. रोहन हा मूळचा नवे वाड्डे येथील राहणारा असून त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख किमतीचा 1 किलो गांजा जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT