Land Scam Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : तपासाला वेग; बार्देश ‘मामलेदार’चा चालक गजाआड

योगेश वझरकरला अटक : जमीन हडप प्रकरणात विशेष तपास पथकाची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Land Grabbing Case : राज्यातील जमीन हडपप्रकरणी एसआयटीने सखोल चौकशीस सुरवात केल्यानंतर बोगस दस्तावेजद्वारे जमीन विक्री करणाऱ्या अनेक दलालांना गजाआड करण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये अटक केलेल्या व सध्या जामिनावर असलेल्या ‘मास्टरमाईंड्स’ना म्युटेशन्सच्या कामासाठी नेहमी संपर्कात असलेल्या बार्देश मामलेदार कार्यालयातील वाहन चालक योगेश वझरकर (47) याला अटक झाली. अटक झालेला हा तिसरा सरकारी कर्मचारी आहे. यापूर्वी पुरातन खात्यातील दोघांना अटक झाली होती.

डिचोली येथे रहिवासी असलेला संशयित योगेश वझरकर हा बार्देश मामलेदार कार्यालयात चालक म्हणून कामाला आहे. बार्देश मामलेदार कार्यालयातील मामलेदार राहुल देसाई याच्याविरुद्ध एसआयटीने गुन्हा दाखल केला असला तरी अजूनही त्याला अटक झाली नाही की त्याला निलंबित करण्यात आलेले नाही. त्याला मामलेदार पदावरून हटवण्यातही आलेले नाही. मात्र, त्याच्या कार्यालयातील चालक असलेला योगेश वझरकर याला एसआयटीने कारवाई करून अटक केली आहे. त्याला मंगळवारी म्हापसा न्यायालयात उभे केले जाणार आहे.

दस्तावेज मंजुरीसाठी करायचा शिफारस

संशयित योगेश वझरकर हा बनावट दस्तावेज तयार करून जमीन विक्री प्रकरणांमध्ये गुंतलेल्या टोळ्यांसाठी त्यांचे दस्तावेज मामलेदारापर्यंत पोचवण्याचे काम करत होता. त्याने संशयित मोहम्मद सुहेल, विक्रांत शेट्टी, राजकुमार मैथी, रॉयसन रॉड्रिग्ज तसेच सँड्रिक फर्नांडिस या दलालांचे दस्तावेज मामलेदार कार्यालयात लवकर मंजूर करण्यासाठी तसेच त्यांची शिफारस मामलेदारांकडे करत होता. या कटकारस्थानमध्ये त्याचाही सहभाग असल्याचे एसआयटीने केलेल्या तपासातून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

SCROLL FOR NEXT