Drishti Lifeguard Goa Dainik Gomantak
गोवा

Drishti Lifeguard Goa : गोव्यात पर्यटकांवर ‘दृष्‍टी’ची करडी नजर

राज्यात पर्यटकांची संख्‍या वाढली; आठ दिवसांत वाचविले आठजणांचे प्राण

गोमन्तक डिजिटल टीम

Drishti Lifeguard Goa : राज्यात पर्यटन हंगाम सुरू झाल्‍यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर येत आहेत. त्‍यामुळे आपसुकच जीवरक्षकांची जबाबदारी वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत आठ जणांचे प्राण वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे, अशी माहिती ‘दृष्टी’तर्फे देण्यात आली.

मांद्रे समुद्रात कोल्हापूर येथील बाप-लेक पोहत होती. त्‍यांचे वय अनुक्रमे 38 व 8 असे होते. पोहताना हे दोघेही एका मोठ्या लाटेने वेगळे झाले. त्यात मुलगी समुद्रात खेचली गेल्याने तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात वडीलही पाण्‍याच्‍या प्रवाहात अडकला. परिस्थिती लक्षात येताच दृष्टीचे जीवरक्षक सिद्धेश, करण आणि तुषार यांनी धाव घेऊन त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर परत आणले.

दूधसागर येथील दुसऱ्या एका घटनेत जीवरक्षक विठ्ठल यांनी दोघांचे प्राण वाचविले. तर, गुजरातमधील महिला व पुरुष हे समुद्रात पोहत असताना अचानक लाटेने त्यांना धडक दिली. प्रवाह जास्त असल्याने दोघेही आणखी खोलवर खेचले गेल्याने त्यांना पुन्हा खडकाळ कडांवर पोहोचता आले नाही. परिस्थिती लक्षात येताच जीवरक्षकाने रेस्क्यू ट्युबच्या मदतीने दोघांनाही वाचविले.

पाटणे येथे मुंबईतील एक पुरुष आणि दोन महिला पाण्‍याच्‍या जोरदार प्रवाहाच्या समुद्रात ओढल्या गेल्या. त्यांना पोहता येत नसल्याने गटांगळ्या खाऊ लागले. तेथील जीवरक्षकाच्या ही गोष्ट नजरेस पडताच त्यांनी समुद्रात उडी घेऊन त्‍यांना वाचविले.

सेल्फी काढताना काळजी घ्या

एका घटनेत सेल्फी काढणारी 22 वर्षीय महिला घसरली आणि पाण्यात पडली. जीवरक्षक विठ्ठल यांनी पाण्यात उडी घेऊन रेस्क्यू ट्युबच्या मदतीने तिचे प्राण वाचविले. किनाऱ्यावर सेल्फी काढताना पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ‘दृष्टी’तर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT