Dr. Uday Kudalkar Workshop in Ibrampur by Mauli Creations Dainik Gomantak
गोवा

Ibrampur : सूत्रसंचालक संवाद साधणारा ‘सेतू’ - डॉ. उदय कुडाळकर

डॉ. उदय कुडाळकर : माऊली क्रिएशन्सतर्फे इब्रामपूरमध्ये कार्यशाळा

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी : सूत्रसंचालन ही जशी एक कला असून ते एक शास्त्रही आहे. सूत्रसंचालक हा व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असतो. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी पुन्हा-पुन्हा श्रोत्यांना गुंतवून ठेवण्याचे काम सूत्रसंचालक करतो, असे मत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. उदय कुडाळकर यांनी केले.

इब्रामपूर पेडणे येथे माऊली क्रिएशन्सतर्फे आयोजित केलेल्या सूत्रसंचालन कार्यशाळेच्या उद्‍घाटन कार्यक्रमाप्रसंगी डॉ. उदय कुडाळकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

व्यासपीठावर इब्रामपूर हणखणे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक धावसकर, कार्यशाळेचे मार्गदर्शक अरविंद नाईक, पंच रोशन गवस, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक परेश परवार, माऊली क्रिएशन्सचे अध्यक्ष दीपक शिरोडकर आदी उपस्थित होते.

सरपंच अशोक धावसकर म्हणाले, विविध कार्यक्रमांत सुसूत्रता आणण्यासाठी व दर्जा वाढविण्यासाठी नवोदितांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी माऊली क्रिएशनतर्फे सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा पालयेकर व परेश पवार यांनीही आपले विचार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ghodemodni: 'बोला पुंडलिक वर दे..'! अभूतपूर्व जल्लोषात सर्वणची घोडेमोडणी साजरी; शेकडो नागरिकांची उपस्थिती

Goa Politics: 'काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार'! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी घेणार निर्णय

Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

Goan Migration: 5 वर्षांत 'इतक्या' गोमंतकीयांकडून भारतीय नागरिकत्‍वाचा त्‍याग; 99 % लोकांनी निवडले 'पोर्तुगाल'

Gautam Gambhir: "टीका करा, मी पर्वा करत नाही"! सोशल मीडिया ट्रोलिंगवरून गंभीरचे रोखठोक मत; बांधिलकी संघाशी असल्याचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT