School Committee Dainik Gomantak
गोवा

School Committee: फोंडा हेडगेवार विद्यालयात पालक-शिक्षक संघाची निवड

Parent Teacher Association: कुर्टी येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेला माध्यमिक विभागातील असंख्य पालकांची उपस्थिती होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: कुर्टी येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेला माध्यमिक विभागातील असंख्य पालकांची उपस्थिती होती. या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघाची नवी कार्यकारिणी निवडली.

नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष साळू भगत, उपाध्यक्ष सरिता गावडे, खजिनदार ज्योतिबा हिरोजी, सचिव महंतेश मदार (शिक्षक) सहसचिव केतन गावकर (शिक्षक). या सभेसाठी कुजिरा येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दीपक आमोणकर उपस्थित होते.

दीपक आमोणकर म्हणाले, की केवळ गुणांच्या मागे न धावता भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष उदय तिळवे, व्यवस्थापक सुदेश कवळेकर, पालक प्रतिनिधी साळू भगत, मुख्याध्यापक सर्वेश्वर भैरेली तसेच ज्येष्ठ शिक्षक चेतन बोरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका सुमेधा नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रिया गावकर यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT