Valpoi Birondem Panchayat Dainik Gomantak
गोवा

Sattari News: भिरोंड्यातील धोकादायक पुलांची पुनर्बांधणी; नागरिकांना दिलासा

Valpoi: आमदार डॉ. दिव्‍या राणे यांच्या प्रयत्‍नांना यश

गोमन्तक डिजिटल टीम

पर्ये मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रात विकासकामांना चालना देऊन आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी बरीच कामे मार्गी लावली आहेत. त्याचप्रमाणे भिरोंडा पंचायत क्षेत्रातून वाळपईकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या जुन्या पुलांची पुनर्बांधणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. अवघ्या दोन वर्षांच्या काळात या पुलांचा प्रश्‍‍न मार्गी लावल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भिरोंडा पंचायत क्षेत्रातून वाळपईकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. त्यात होंडा ते वाळपई व्हाया अडवई तर फोंडा ते वाळपई व्हाया पाडेली या दोन प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. परंतु या महत्त्वाच्या रस्त्यावर असलेले पूल फार जुने झाले होते. त्यामुळे त्या जागी नवीन पूल बांधण्याची गरज होती.

त्यानुसार भिंरोडा पंचायत मंडळाच्या वतीने आमदार डॉ. दिव्‍या राणे यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार राणे यांनी करून सदर रस्त्यावरील तीन पुलांची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेऊन ते मार्गीही लावले. यामध्ये गावडेवाडा-पाडेली, सावर्शे या ठिकाणीच्या पुलांचा समावेश आहे, अशी माहिती भिंरोडा पंचायतीचे सरपंच उदयसिंह राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT