mapusa fish market
mapusa fish market 
गोवा

म्हापसा मासळी मार्केटला उतरती कळा

Dainik Gomantak

म्हापसा

सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर म्हापसा मासळी मार्केट पालिकेने पुन्हा सुरू केले असले, तरी सध्या या मार्केटला उतरती कळा लागलेली आहे. आर्थिक कारणास्तव ग्राहकांचा, तर गिऱ्हाईक उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांचा अशा दोन्ही घटकांचा या मार्केटला फारसा प्रतिसाद लाभत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
गेल्या तीन दिवसांपासून हे मार्केट सुरू असले तरी लोकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. उलट या मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. दुसऱ्या बाजूने विक्रेत्यांचाही भ्रमनिरास झालेला आहे. परवा मंगळवारी पहिल्या दिवशी या मार्केटमध्ये ६३ विक्रेते होते, तर त्यानंतर काल बुधवारी ४५ विक्रेते आले होते. परंतु विक्रेत्यांची ही संख्या आज सुमारे ३६ एवढी कमी झाली, अशी माहिती यासंदर्भात बोलताना म्हापसा पालिकेच्या मार्केट समितीचे अध्यक्ष नगरसेवक सुशांत हरमलकर यांनी दिली.
मासळी मार्केट सध्या दररोज सकाळी सात ते दुपारी तीन अशा वेळेत खुले ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासंदर्भातील व्यवहार व कामकाज सुव्यवस्थित चालावेत या हेतूने नगराध्यक्ष रायन ब्रागांझा दररोज सकाळी त्या ठिकाणी उपस्थित राहून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवून आहेत. त्याबाबत नगरसेवक फ्रॅंकी कार्वाल्हो व सुशांत हरमलकर यांचेही त्यांना चांगल्यापैकी सहकार्य लाभत आहे. पालिका मंडळाच्या सत्ताधारी गटातील हे नगरसेवक पालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच अन्य कर्मचाऱ्यांना विविध सूचना करीत आहेत.
दरम्यान,  तिसऱ्या दिवशीही मांस विक्री स्टॉल्सनासुद्धा ग्राहकांकडून अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. सध्या मांस विक्रीचे किती स्टॉल कार्यरत आहेत, अशी विचारणा केली असता नगराध्यक्ष रायन ब्रागांझा म्हणाले, आजच्या घडीस तिथे प्रतिदिन विशिष्ट संख्येने स्टॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बकऱ्याचे मटन, गोमांस आणि डुकराचे मांस अशा तीन प्रकारांचे प्रत्येक तीन स्टॉल आणि चिकनचा एक स्टॉल असे मिळून सध्या दहा स्टॉल आळीपाळीने कार्यरत ठेवण्यास पालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे.
सध्या मासळी मार्केट परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे, असे प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे संपूर्ण मासळी मार्केट परिसर दररोज सायंकाळी पाण्याने धुऊन काढावा, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. पालिकेकडे मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी असतानाही तिथे अस्वच्छता असण्यामागचे कारण नेमके काय यासंदर्भात विचारणा करण्यासाठी मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याबाबत प्रतिसाद दिला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT