Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao News : मडगावात घरपट्टीच्या दुप्‍पट पावत्‍या; शॅडो कौन्‍सिलचा दावा

ताळमेळ नसल्‍याचा परिणाम

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगावच्या शॅडो कौन्सिलने मडगाव पालिकेत घरपट्टी भरण्याच्या संदर्भात विलक्षण परिस्थिती नजरेस आणून दिली आहे. सुधारित स्वच्छता शुल्काच्या अंमलबजावणीच्या काळापासून शॅडो कौन्सिल सातत्याने दावा करत आला आहे, की घरपट्टी भरण्यासाठी काउंटरवर होणारी गर्दी तात्पुरती असून ती वादग्रस्त जागांचा करभरणा करण्यासाठी होत आहे.

आता दुप्पट पावत्यांची समस्या पुढे येत असल्याने ही वस्तुस्थिती हळूहळू स्पष्ट होत आहे, असा दावा शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला आहे.

मडगावमध्ये अनेक जागा अशा आहेत, की ज्यांच्या बाबतीत कुटुंबातील सदस्यांमध्ये किंवा मालक आणि रहिवाशांमध्ये वाद आहेत. या कारणास्तव प्रत्येकाची इच्छा अशी असते, की पालिकेत कर भरणारे आपण पहिले ठरावे आणि कराची पावती दस्तऐवज म्हणून आपल्याजवळ ठेवावी.

पुढच्या काही महिन्यांत पालिकेला हे वास्तव लक्षात येईल की, कायदेशीररीत्या मूल्यांकन केलेल्या जागांचे मालक पालिकेवर नाराज आहेत. कारण पालिका राजकारण्यांच्या ‘व्होट बँकांना’ विनामूल्य सेवा प्रदान करताना कायदा पाळून घरपट्टी भरणाऱ्या लोकांच्या खिशाला चिमटे काढणे पसंत करत आहे, असे कुतिन्हों यांनी म्हटले आहे.

घरपट्टी भरण्याच्या अनेक पर्यायांमुळे दुप्पट पावत्या दिल्या जाण्याची विचित्र परिस्थिती दिसून येत आहे. विवादित जागेशी संबंधित एकटा घरपट्टीची पावती मिळवणारे आपण पहिले ठरू या आशेने रांगेत उभा असताना त्याचा विरोधक ऑनलाइन पद्धतीने घरपट्टी भरत असतो, असे कुतिन्हो यांनी नजरेस आणून दिले आहे. परंतु पालिकेकडून अन्यायकारकरीत्या दोघांनाही पावती दिली जात असल्याचे आढळून आले आहे.

दोघांनी घरपट्टी भरलेली असली, तरी यापैकी कोणीही परतावा मागू शकत नाही. कारण पावती अस्तित्वात नसलेल्या म्हणजे मृत व्यक्तीच्या नावाने जारी केली जाते आणि शेवटी यात पालिकेला फायदा होतो असे आढळून आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात कर विभागाकडे चौकशी केल्यास त्यांच्याकडून असा दावा केला जातो की, जर दुप्पट रक्कम भरल्याचे कोणत्याही व्यक्तीने पालिकेच्या निदर्शनास आणले, तर भरलेली अतिरिक्त रक्कम न पुढील वर्षासाठी सामावून घेतली जाते. तथापि, महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, दोनपैकी कोणती पावती वैध मानली जाईल, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.

कामकाजात सुसूत्रता हवी!

कुतिन्हो म्हणाले, 6 एप्रिल रोजी एका व्यक्तीद्वारे घरपट्टी ऑनलाइन भरण्यात आली होती, ज्याची पावती १७ एप्रिल रोजी जारी करण्यात आली. त्याच दिवशी जारी केलेल्या अन्य एका पावतीद्वारे १० एप्रिल रोजी दुसऱ्या व्यक्तीने काउंटरवर भरलेली रक्कम स्वीकारण्यात आली. हे प्रकार मडगाव पालिकेने गांभीर्याने घेत ऑनलाईन पेमेंटचा ताळमेळ घालून कामकाजात सुसूत्रता आणणे आणि अशा समस्यांना आळा घालणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT