Goa Assembly Election  Dainik Gomantak
गोवा

धर्मांध शक्तींना तसेच मोफत गोष्टी वाटणाऱ्या पक्षाला मतदान नको; चर्च

कृषी कायदे, अल्पसंख्यांकांवर झालेले हल्ले अशा सगळ्या बाबींचा विचार करायला हवा; फादर बोलमॅक्स परेरा

दैनिक गोमन्तक

गोव्यात उद्या सकाळ पासून मतदानाला सुरुवात होत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटण्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज गोव्यात (goa) झालेल्या प्रार्थना सभेत गोव्यातल्या चर्च मधून गोव्याच्या निवडणूकीत (Election) धर्मांध शक्ती तसेच मोफत गोष्टी वाटणाऱ्या पक्षाला मतदान करु नये असा संदेश गोव्यातील जनतेला चर्चने दिला आहे. तसंच पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवायलाही सांगण्यात यावेळी सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, याबाबत फादर बोलमॅक्स परेरा म्हणाले ”हा संदेश फक्त ख्रिश्चन मतदारांसाठी नाही. सर्वधर्मीय मतदारांनी या सूचनेकडे लक्ष द्यावं आणि मतदान करण्यासाठीची हे पत्र आहे. गोव्यात कायम सर्वधर्मसमभाव आहे. याला तडा जाण्यासाठी जे पक्ष प्रयत्न करतायत त्यांना नाकारा. तसंच आज प्रार्थनेत देखील आम्ही हे सांगितलं आहे. लोकांनी पर्यावरण विकास तसंच महत्वाचे जे प्रश्न आहेत त्यानुसार मतदान करायला हवं”

गोव्यात ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चर्च (Church) काय भुमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यांच्याकडून शनिवारी याबाबतची भुमिका स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर रविवारच्या प्रार्थनेत देखील याबाबत माहिती देण्यात आली. चर्च कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात पक्षांतर करुन उमेदवार लोकांनी दिलेला कौल नाकारत आहेत असं म्हणलेलं आहे. या सगळ्यांना धडा शिकवायला देखील सांगण्यात आलं आहे. तसंच कृषी कायदे, अल्पसंख्यांकांवर झालेले हल्ले अशा सगळ्या बाबींचा विचार करायलाही सांगण्यात आलं आहे. राज्यात मोफत वस्तु आणि योजनांच्या माध्यमातून देखील काही पक्ष अमीष देत आहेत. त्यांनाही नाकारावं असं सांगण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT