Nilesh Cabral on Goa Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Goa Lok Sabha Election 2024 Voting: गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी आज (सात मे) रोजी मतदान होत आहे.

Pramod Yadav

गोव्यातील दोन लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवार, दि.०७ मे) मतदान होत आहे. राज्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान झाले आहे. राज्यात मतदानाची घाई सुरु असताना भाजपच्या माजी मंत्र्यांनी राज्यातील काही चर्च वरोधात वक्तव्य केले आहे.

राज्यातील काही चर्चेसनी भाजप विरोधात मतदान करण्याचे आवाहन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गोव्याचे माजी भाजप मंत्री आणि कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील काही चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे काब्राल यांनी सांगितले.

याबाबत त्यांच्याकडे पुरावे असून, योग्य वेळ आल्यानंतर बाहेर काढू असेही काब्राल म्हणाले. चर्चमधून अशाप्रकारचे आवाहन करणे योग्य नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

काब्राल यांनी चर्चमधून केल्या जात असलेल्या अशा आवाहनाबाबत नाराजी व्यक्त केली, तसेच योग्य उमेदवाराला मतदान करावे असे त्यांनी सांगणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात सकाळपासून विविध मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक हजेरी लावत आहेत. सकाळी नऊपर्यंत राज्यात एकूण 13.02 टक्के मतदान झाले असून, उत्तेरत 12.80 तर दक्षिणेत 13.24 टक्के मतदानाची नोंद झालीय.

राज्यातील लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक, रमाकांत खलप, पल्लवी धेंपे, विरियातो फर्नांडिस, मनोज परब यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT