Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa: टॅक्सी ॲप नको; मोपा विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सी स्टॅंडला परवानगी द्या

आम्हाला ॲपआधारित टॅक्सी व्यवसाय करायचा नाही, या भूमिकेवर पेडणेतील युवक ठाम असल्याचे खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: पडेणे तालुक्यातील युवकांचा बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकार जर सकारात्मक पाऊल उचलत असेल तर त्यांनी मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सी स्थानकाला परवानगी द्यावी.

आम्हाला ॲपआधारित टॅक्सी व्यवसाय करायचा नाही, या भूमिकेवर पेडणेतील युवक ठाम असल्याचे खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले. ते आझाद मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी पेडणेतील सरपंच, पंचांना बोलावून युवकांची समजूत काढायला सांगितले. मात्र, या व्यवसायात जे टॅक्सीचालक आहेत त्यांच्याशी बोलण्यास सरकारला धाडस नाही. पेडणेच्या युवकांना विमानतळावर नोकरी देणार, असे आश्‍वासन सरकारने दिले होते.

टॅक्सी व्यवसायाच्या अनुषंगाने बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याची सरकारकडे संधी होती, तीदेखील धुडकावण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. सरकारला जर हा प्रश्‍न सोडवायचा असेल तर पर्यटन खात्याऐवजी वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश का केला जात नाही, असा प्रश्‍न ताम्हणकर यांनी उपस्थित केला.

पेडेणेतील अनेकांनी टॅक्सी बूक केल्या आहेत. मात्र, ते संभ्रमावस्थेत आहेत; कारण त्यांना सरकार कोणता निर्णय घेईल हे माहीत नाही. कमिशन खाण्यासाठी सरकारने आम्हाला बळी पाडू नये, असे ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT