Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: गोव्यात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची आता खैर नाही, थेट वाहन जप्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Goa News: गोव्यात येत्या एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' हा स्वच्छता उपक्रम नगरपालिका आणि पंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे.

Pramod Yadav

Goa News

पणजी: गोवा स्वच्छ ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कडक पाऊले उचलताना दिसत आहेत.

राज्यात यापुढे कोणी रस्त्यावर कचरा फेकताना आढळून आल्यास त्याचे वाहन जप्त केले जाणार आहे तसेच, त्याच्याकडून दंड देखील वसूल केला जाणाराय. गोव्यात येत्या एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' हा स्वच्छता उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेद्वारे याबाबत माहिती दिली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देश स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पुढाकार घेतला. स्वच्छ भारत मिशन ही एक राष्ट्रीय चळवळ आहे.

गोव्यात येत्या एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' हा स्वच्छता उपक्रम नगरपालिका आणि पंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जाणार असल्याची माहिती सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांनी रस्त्यावर कचरा करणाऱ्यांना देखील इशारा दिला असून, कोणी रस्त्यावर कचरा फेकताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यक्तीचे वाहन जप्त करुन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच, कचरा फेकताना कोणी आढळून आल्यास त्याचा फोटो देखील पाठविण्याचे आवाहन सावंतांनी नागरिकांना केले आहे.

औद्योगिक क्षेत्र आणि हॉटेल्स यांच्या बाबतीत सुद्धा कायदा कडक करण्यात आल्याचे सावंत यांनी नमूद केले. हॉटेल आणि औद्योगिक क्षेत्रात कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदारांनी पंचायत नाहीतर घनकचरा व्यवस्थापन मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, असे सावंत म्हणाले. औद्योगिक कचरा कोणी टाकताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT