Lawrence Silveira Dainik Gomantak
गोवा

गोव्याला ‘रेड लाइट एरिया’ बनवू नका! एस्कॉर्ट सेवेवर कठोर कारवाईची सिल्वेरा यांची मागणी

Lawrence Silveira: लॉरेन्स सिल्वेरा यांनी उत्तर गोव्यातील किनारपट्टी परिसरात एस्कॉर्ट सेवा पुरविणाऱ्या संकेतस्थळांवर बंदी घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Lawrence Silveira Demand To Ban Escort Service Websites

म्हापसा: एस्कॉर्ट संकेतस्थळांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे कौतुक करताना कळंगुट काँग्रेसचे गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा यांनी उत्तर गोव्यातील किनारपट्टी परिसरात एस्कॉर्ट सेवा पुरविणाऱ्या संकेतस्थळांवर बंदी घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

कळंगुट काँग्रेसचे गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा, गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा, शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, अशा बेकायदा कारवायांमुळे केवळ कळंगुट, शिवोलीची नव्हे तर संपूर्ण गोव्याचे नाव बदनाम होत आहे.

खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर गोवा केवळ पर्यटनावर अवलंबून आहे, मात्र पर्यटन खाते ज्या पद्धतीने काम करत आहे, ते बघितल्यास हा व्यवसायही कोलमडून पडेल. याला संपूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असे लॉरेन्स सिल्वेरा म्हणाले.

खाण काम बंद करण्यास भाजप जबाबदार असून आता एस्कॉर्ट सेवेवरून पर्यटन नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एस्कॉर्ट वेबसाइट सुरू ठेवून गोव्याला रेड लाइट एरिया बनवू नका. एस्कॉर्ट सेवा चालविणाऱ्या सर्व वेबसाइट ब्लॉक करण्यात याव्यात, असे सिल्वेरा म्हणाले.

या अवैध धंद्यांबाबत पोलिस अनभिज्ञ आहेत, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. युरी आलेमाव यांनी हा मुद्दा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला नसता तर पोलिसांनी काहीच केले नसते. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली असून त्यामुळेच लैंगिक तस्करी वाढली आहे. येथे येणारे पर्यटक आमच्या मुली-बहिणींशी बेशिस्त वर्तन करतात. गोवा हा रेड लाइट एरिया नाही, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे सिल्वेरा म्हणाले.

काही संकेतस्थळांवर पोलिस कारवाई करत असले तरी कळंगुटमध्ये या सेवा देण्याचे आश्वासन देणाऱ्या अनेक संकेतस्थळे अजूनही सुरू आहेत, असे सिल्वेरा यांनी निदर्शनास आणून दिले.

मुली, बहिणींशी गैरवर्तन; डिसिल्वा

विवेक डिसिल्वा म्हणाले की, अशा प्रकारांमुळे आपल्या समृद्ध सुसंस्कृत राज्याची बदनामी होते. उत्तर किनारपट्टीतील आमच्या मुली आणि बहिणींना संध्याकाळी घराबाहेर पडता येत नाही. नुकतेच कळंगुट येथील एका पर्यटकाने स्थानिक मुलीबद्दल अश्लील टिप्पणी केली. अशा वेबसाइटवर गोव्याला एस्कॉर्ट सेवेचे हब म्हणून दाखवण्यात येत असल्याने ते बेशिस्त वागण्याचे धाडस करतात, असे ते म्हणाले. या वेबसाइट पूर्णपणे बंद करण्यात याव्यात, अन्यथा गोव्याच्या रक्षणासाठी राज्यभर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

संध्याकाळी घराबाहेर पडणे झाले कठीण; नागवेकर

पार्वती नागवेकर म्हणाल्या की, शिवोलीमध्ये अशा बेकायदा कामांमुळे महिला संध्याकाळी घराबाहेर पडण्यास घाबरतात. कळंगुट आणि शिवोलीच्या जनतेने याविरोधात आवाज उठवला असला तरी भाजप सरकारने त्याच्याकडे दुर्लक्षच केले आहे, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

SCROLL FOR NEXT