Siddhanna Meti And Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

Ghati remark controversy: मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो विनाकारण लोकांना हिणवून त्यांचा शाप घेऊ नका. मोठ्या मोठ्या लोकांच्या पाठिमागे लागा, तुमचे भविष्य उज्वल आहे, असे मेटी म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: "आम्हाला घाटी - घाटी म्हणून हिणवू नका. विनाकारण लोकांचा शाप घेऊ नका", अशी विनंती कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धन्ना मेटी यांनी गोवा रिव्हॉल्युशनरी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांना केली. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र शेजारी राज्य असून, एकमेकांचे भाऊ आहेत, असेही मेटी म्हणाले.

वारंवार आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका. आमची कपडे बघा कशी आहेत. आम्ही येथे पोटासाठी काम करतो, चोरी करत नाही. काही लोक गुन्हेगारी कृत्य करत असतील, ते नाकारता येत नाही. पण, देशात संविधान नाही का? असा सवाल मेटी यांनी उपस्थित केला.

"देशात संविधान आहे म्हणून आज कोणीही आमदार, खासदार होऊ शकते. आज मला तुमचे नाव घ्यायची लाज वाटते. रात्री ग्लास घेऊन तुम्ही बोलत असता मला कल्पना आहे. पण, तुमची सर्व कुंडली लोकांनी काढली आहे", असे मेटी म्हणाले.

"उत्तर भारतीयांनी संपूर्ण गोव्याची वाट लावलीय, जुवारी घोटाळा, याचा विचार करुन ते विषय हाती त्यांनी घ्यावे त्याला आमचाही पाठिंबा आहे. मोठे विषय लावून धरावेत, गरीबांच्या पाठिमागे लागून त्यांचा शाप त्यांनी घेऊ नये", असे मेटी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

"सगळे लमाणी गुन्हेगार असत नाहीत, असं बोलण्याची गरज नाही. आमचेही राज्यात मतदान आहे. पुढे जिल्हा पंचायत जिंकू, आमदारही निवडून आणू. सर्वजण प्रेमाने भाऊ म्हणून राहुया", असे मेटी म्हणाले.

तुम्ही बेळगाव जाता आम्ही गोव्यात येतो. माझे ५३ वर्षे वय आहे माझा इथेच जन्म झाला, इथेच शिक्षण झाले. आमचे कपडे बघ आणि तुझे कपडे बघ, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो विनाकारण लोकांना हिणवून त्यांचा शाप घेऊ नका. मोठ्या मोठ्या लोकांच्या पाठिमागे लागा, तुमचे भविष्य उज्वल आहे, असे मेटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT