Sadanand Tanawade Statement on Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

व्यवसाय कायदेशीर असल्यास लोबोंनी घाबरू नये: सदानंद तानावडे

चूक नसेल तर सिद्ध करा ; राणे यांच्याकडून प्रशासकीय कारवाई

दैनिक गोमन्तक

म्हापसा : विरोधी पक्षनेता मायकल लोबो यांना सरकारकडून निवडक लक्ष्य होत असल्याच्या कथित आरोपांचे खंडन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले, मुळात जर लोबो यांचा व्यवसाय कायदेशीर असेल तर त्यांना घाबरण्याचे कारणच नाही. लोबोंनी चूक केली आहे की नाही, हे चौकशीवेळी समजेलच असा टोला त्यांनी लोबो यांच्यावर लगावला.

सोमवारी (ता. 13) म्हापशात ‘ई-श्रम कार्ड’निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मुळात मला लोबोंविषयी भाष्य करायचे नाही. कारण, ते काही भाजपाचे सदस्य नाहीत. ते आता विरोधी पक्षनेता आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे त्यांच्या समर्थनात बोलत आहेत. पण, पाटकरांना याप्रश्नी किती माहिती आहे? याची मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया तानावडे यांनी दिली.

भाजपाचे मंत्री विश्वजीत राणे यांना मिळालेल्या माहितीनुसार, ते प्रशासकीय कारवाई करीत आहेत. आता हे आरोप बरोबर की चूक आहेत, ते विरोधी पक्षनेता लोबो यांनी सिद्ध करावेत, असेही तानावडे म्हणाले.

भाजपात काँग्रेसचे दहा आमदार प्रवेश करणार अशा बातम्या ऐकू येताहेत, याप्रश्नी विचारले असता सदानंद तानावडे म्हणाले की, यासंदर्भात माझ्याकडे अजून एकाही आमदाराने संपर्क साधलेला नाही. जोपर्यंत प्रदेशाध्यक्षांना माहिती दिली जात नाही, तोवर पक्षात कुणालाच घेतले जात नाही. जरी कुणी केंद्राकडे थेट गेले असल्यास मला माहिती पुरविली जाईल.

मात्र, आजपर्यंत किंवा आतापर्यंत मला अशी कुठलीच माहिती मिळालेली नाही, असे स्पष्टीकरण तानावडे यांनी दिले. सध्या भाजपाचे राज्यात भक्कम सरकार आहे. यात भाजपाचे 20 आमदार, मगोपचे दोन तर अपक्ष तीन आमदारांचा पाठिंबा असून सरकारचे बऱ्यापैकी काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

SCROLL FOR NEXT