Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

स्मशानभूमीसाठी जागा दान करणे सर्वात मोठे सत्कार्य : गावडे

मिराबाग स्मशानभूमीचे लोकार्पण

दैनिक गोमन्तक

केपे : स्मशानभूमीसाठी आपली जागा देणे, हे एक पवित्र दान असल्याचे उद्‍गार कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी काढले. ते मिराबाग सावर्डे येथे सुशोभीकरण करण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या उद्‍घाटन कार्यक्रमात बोलत होते.

सावर्डेचे आमदार गणेश गावकर, सरपंच संदीप पाऊसकर, पंच सदस्य संजय नाईक, अमेय नाईक, नितेश नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. या जन्मात आलेल्या माणसाला जावेच लागते, पण काही ठिकाणी स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी ताटकळत राहावे लागते. यासाठी प्रत्येक गावात सुसज्ज अशी स्मशानभूमी असणे गरजेचे आहे.

राज्य सरकारने याचा विचार करून गावोगावी स्मशानभूमी बांधण्यावर भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले. मिराबाग येथील या स्मशानभूमीचे काम ग्रामीण विकास खात्यातर्फे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मिराबाग येथील स्मशानभूमी छोट्या जागेत होती, त्याच जागेवर त्याचे सुशोभीकरण काम हाती घेतले होते, पण गावातील घरघरो नाईक यांनी आपली काही जागा या स्मशानभूमीला दान करून सुसज्ज अशी स्मशानभूमी तयार झाल्याने आमदार गावकर यांनी घरघरो नाईक यांचे अभिनंदन केले.

नाईक यांनी एक चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले. पंच सदस्य संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एक अत्यंत चांगले काम झाले असून लोकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल गावकर यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT