Donald fernandes violin cycling Dainik Gomantak
गोवा

VIDEO: 'व्हायोलिन वाजवत चालवली सायकल', गोव्याच्या 'डोनाल्ड'चा अनोखा पराक्रम; मानसिक आरोग्याबाबत जागृतीचा दिला संदेश

Donald fernandes violin cycling: डोनाल्ड फर्नांडिस हे सांगोल्डा- बार्देश येथील एक उमदे व्यक्तिमत्त्व. ३० वर्षांपूर्वी ते युवा काळात असताना, डोनाल्ड फर्नांडिस यांनी एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला होता.

prakash talavnekar

प्रकाश तळवणेकर 

डोनाल्ड फर्नांडिस हे सांगोल्डा- बार्देश येथील एक उमदे व्यक्तिमत्त्व. ३० वर्षांपूर्वी ते युवा काळात असताना, डोनाल्ड फर्नांडिस यांनी एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला होता – तो म्हणजे व्हायोलिन (सारंगी) वाजवत ४० किलोमीटर सायकल चालवणे. १९९६ च्या सुमारास डोनाल्ड हे २२ वर्षांचे होते त्यावेळी ते कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते .लहानपणापासून त्यांना सायकल चालवण्याची आवड होती आणि त्याचबरोबर व्हायोलिन या वाद्यावरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते.

डोनाल्ड फर्नांडिस एका सामान्य कुटुंबातील. समाजातील दिव्यांग व्यक्तीना कुटुंबात व समाजात मिळणारी वागणूक पाहून त्यांना दुःख व्हायचे. त्यांच्यासाठी काहीतरी आपण केले पाहिजे असे त्यांना मनातून वाटायचे. यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. मानसिक दिव्यांग असलेल्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या संस्थाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीद्वारे, अशा व्यक्तींना भाड्याच्या घरात ठेवून त्यांचे मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

त्यात बऱ्यापैकी यशही येऊ लागले. त्यानंतर सायकल चालवायच्या व व्हायोलिन वाजवण्याच्या छंदाचा उपयोग मानसिक दिव्यांगाना आधार मिळण्यासाठी करावयाचा निश्चयच त्यांनी केला. सायकल चालवून किंवा व्यायाम करून शरीर निकोप व निरोगी राहते तर व्हायोलिन किंवा अन्य संगीत वाद्य वाजवून मनाला समाधान आणि शांतता मिळते. बऱ्याचदा आपण अनेक विवंचनेत असतो व त्याचा परिणाम मनावर होऊन जीवन दुःखी होते.

अशावेळी मन स्थिर राखले तर अशा संकटांचा आपण सहजपणे सामना करू शकतो. याचसाठी, सायकलवरून व्हायोलिन वाजवत जाताना तुम्ही शरीराची सुदृढता सांभाळताना तसेच मनही शांत ठेवा हा संदेश देण्याचा माझा प्रयत्न असतो. यानंतर आपण मोटर सायकलवर माऊथ ऑर्गन व व्हायोलिन एकत्रितपणे वाजवून, मन शांत ठेवा व आनंदित रहा असा संदेश देणार असल्याचे ते म्हणाले.

मानसिक दिव्यांग रुग्णांना निवारा, अन्न, औषधे आणि पुनर्वसन सुविधा पुरवणाऱ्या ‘स्ट्रीट प्रॉव्हिडन्स’ (Street Providence) या संस्थेचे संस्थापक म्हणून, डोनाल्ड खरोखरच एक सकारात्मक आणि ठोस बदल घडवून आणत आहेत.

विशेष म्हणजे, त्यांनी एक शेती प्रकल्पही सुरू केला आहे, ज्याचे व्यवस्थापन या निवारा केंद्रांमधील रहिवासीच म्हणजे मानसिक दिव्यांग व्यक्ती करतात. याद्वारे ‘कामाच्या माध्यमातून उपचार’ (therapy through work) या संकल्पनेला चालना दिली जाते. या सगळ्याचा बराच चांगला परिणामही जाणवून येतो. या निवारा केंद्रातील रहिवाशांची बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात वेळोवेळी तपासणी करण्यात येते.

मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या डोनाल्ड फर्नांडिस यांनी, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अलीकडेच, २२ मार्च रोजी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्कल ते मोपा टोल ब्रिज हा ५ किलोमीटरचा प्रवास सायकल चालवत व त्याचवेळी व्हायोलिन वाजवत केला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT