Dona Paula Theft, Dona Paula Robbery Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Theft: दरोडेखोरांच्या वर्णनात विसंगती! पोलिसांना सापडेनात ठोस धागेदोरे; विशेष पथकाची स्थापना

Dona Paula Demp Robbery: धेंपो यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी जिल्हा व क्राईम ब्रँच पोलिसांचे संयुक्त विशेष पोलिस पथक स्थापन केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: दोना पावला येथील नागाळी हिल्सच्या परिसरातील जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी जिल्हा व क्राईम ब्रँच पोलिसांचे संयुक्त विशेष पोलिस पथक स्थापन केले आहे. या पथकांनी शेजारील राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला आहे.

दोन दिवस उलटून गेले, तरी पोलिसांना या दरोड्याप्रकरणी ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. दरोडेखोरांनी बुरखे घातले होते व सीसी टीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर लंपास केल्याने तपासकामाला गती मिळत नाही. या बंगल्यामध्ये ते गेल्या काही महिन्यांत कामाला आले होते का याची माहिती मिळवून तपास सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.

दोना पावला येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या परिसरात सशस्त्र दरोडा पडल्याने पोलिसांचीही नाचक्की झाली आहे. यापूर्वी या परिसरात झालेल्या व पोलिसांत नोंद न झालेल्या भुरट्या चोऱ्यांसंदर्भात पोलिसांनी माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे. धेंपो बंगल्याच्या समोरील बंगल्यामध्ये असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने कोणी या बंगल्याची रेकी करताना दिसत आहे का याचाही तपास केला जात आहे.

ज्येष्ठ धेंपो दाम्पत्य तसेच सुरक्षारक्षक यांच्या जबानी नोंदवून दरोडेखोरांच्या वर्णनाची माहिती गोळा करण्यात येत असली, तर त्यामध्ये विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे दरोडेखोरांचे वर्णन कळण्यास पोलिसांना अडचण येत आहे.

या तपासकामासाठी क्राईम ब्रँचचे अनुभवी पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर तसेच निरीक्षक तुषार लोटलीकर यांचा विशेष तपास पथकात समावेश करण्यात आला आहे.

बंगल्याच्या मागील बाजूने दरोडेखोरांनी कंपाऊंडवरून उडी मारून प्रवेश केला व त्याच वाटेने परत गेले. त्यामुळे या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमधून माहिती मिळवली. मात्र, त्यातून तपासासाठी योग्य अशी दिशा मिळालेली नाही. पोलिसांकडे असलेल्या अट्टल गुन्हेगारांची छायाचित्रे दाखवून दरोडेखोरांची माहिती मिळवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी या तपासकामावर लक्ष ठेवून आहेत.

माहिती उघड न करण्याचे निर्देश

दरोडा पडल्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती देणे टाळले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती उघड न करण्याचे निर्देश दिले आहेत. आज पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांना काही धागेदोरे सापडले असून दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दरोड्याचा उलगडा झाल्यावर त्याची माहिती देऊन अधिक माहिती देणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT