Dona Paula Crime News Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Robbery: दोना पावल दरोडा! नागाळी हिल्स भागात घबराट, 2 महिन्‍यांत गस्‍त वाहन फिरकलेच नाही; वृद्धांच्या सुरक्षेचे काय?

Dona Paula Theft: फोरेन्सिक लेबोरेटरी पथकही दाखल झाले. हा बंगल्याच्या आजुबाजूला असलेल्या बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेरमधून पोलिसांनी काही फुटेज मिळवले.

Sameer Panditrao

पणजी: दोनापावल येथील नागाळी हिल्स भागात झालेल्‍या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेपूर्वी दोन महिन्‍यांत गस्‍त वाहन फिरकलेच नसल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर मात्र तपासासाठी पोलिसांनी ठसे तज्ज्ञ तपासणी अधिकारी तसेच श्‍वान पथकाला पाचारण केले.

फोरेन्सिक लेबोरेटरी पथकही दाखल झाले. हा बंगल्याच्या आजुबाजूला असलेल्या बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेरमधून पोलिसांनी काही फुटेज मिळवले मात्र त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. जिल्हा व क्राईम ब्रँच संयुक्तपणे तपास करीत असून विविध विशेष तपास पथके स्थापन केली आहेत.

हा दरोडा शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४ च्या दरम्यान पडला. दरोडेखोर बंगल्याच्या मागील बाजूने आले व त्याच वाटेने गेले. धेंपो यांच्या बंगल्यासमोर असलेल्या बंगल्यामध्ये सीसी टीव्ही कॅमेरा आहे मात्र त्यामध्ये हे दरोडेखोर बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडले नाहीत. सुरक्षारक्षकाने दिलेल्या जबानीत दरोडेखोर पाचपेक्षा अधिक होते तर वृद्ध धेंपो दांपत्याने दिलेल्या जबानीत त्यांनी तिघे बुरखाधारी दरोडेखोर असल्याची माहिती दिली आहे.

३० हून अधिक वृद्ध; मग त्यांच्या सुरक्षेचे काय ?

पणजी पोलिस स्थानकांच्या अधिकार क्षेत्रातील दोनापावल परिसरात बंद असलेल्या बंगल्यांची तसेच बंगल्यामध्ये वृद्ध राहणाऱ्यांची माहिती ‘बीट पोलिस’ने नोंद केलेली आहे. सुमारे ३० हून अधिक वृद्ध विविध बंगल्यामध्ये राहतात. त्यामुळे या भागात वृद्धांच्या संरक्षणासाठी पोलिस गस्त अधुनमधून सुरू ठेवणे अगत्याचे आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून नागाळी हिल्स परिसरात रात्रीच्यावेळी क्वचितच कधी पोलिस गस्त वाहने फिरतात. गेल्या दोन तीन महिन्यांत तर ही वाहने फिरकलेलीच नाहीत, अशी माहिती तेथील रहिवाशांनी दिली. त्यामुळे पणजी पोलिस स्थानकाचे बीट पोलिस तसेच गस्ती वाहनांचा निष्काळजीपणा या घटनेमधून उघड झाला आहे.

यापूर्वीही अनेक चोऱ्या

गेल्या काही महिन्यात नागाळी हिल्स - दोनापावल परिसरात ५ - ६ चोऱ्या घडल्या आहेत. मात्र या बंगल्याच्या मालकांनी लज्जेपोटी त्याची माहिती पोलिसांत दिलेली नाही. यापूर्वी काही बंगल्यामध्ये चोऱ्या होऊ लागल्याने पोलिसांची झोप उडाली होती. एका बंगल्यात चोरट्याने पहिल्या मजल्यावरील खुल्या असलेल्या खिडकीतून आत घुसून माणसे घरात असतानाही चोरी केली होती. काही बंद घरामध्येही चोऱ्यांचे प्रकार झाले होते. त्यावेळी पोलिसांनी एक स्थानिक चोरटा मारिओ याला अटक केली होती. दोनापावलमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट असूनही पोलिसांनी या भागाकडे दुर्लक्ष केले आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ का?

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या दरोडेसंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिस जनसंपर्क अधिकारी देतील असे सांगत पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी जबाबदारी झटकली. या प्रकरणाचा छडा लागल्यानंतर माहिती दिली जाईल असे उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी सांगून काढता पाय घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असे म्हणत पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी टोलवाटोलवी केली.

बंगल्याची केली रेकी

दरोडेखोरांनी बंगल्यातून किती किंमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले याची अधिकृत माहिती अजूनही पोलिसांनी उघड केलेली नाही. या बंगल्याच्या अवतीभोवती इतरही बंगले आहेत मात्र बंगल्याच्या मागील बाजूस कोणताही बंगला नसून तेथे झाडी आहे. त्याचा फायदा घेऊनच ते बंगल्याच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून आत घुसले. त्यांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केल्यानंतर बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वारचे त्रिपल लॉक क्रो बारने तोडले. त्यामुळे दरोडेखोरे हे सर्व तयारी करूनच आले होते. त्यांनी दरोडा घालण्यापूर्वी या बंगल्याची रेकी केली असण्याची शक्यता आहे. या बंगल्यात वृद्ध दांपत्‍य व वयस्क सुरक्षारक्षक असल्याची माहिती मिळवली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

हाच बंगला का?

धेंपो यांच्या बंगल्यावर घालण्यात आलेला दरोडा हा पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे. दरोडेखोरांनी महिन्यापूर्वी या भागातील बंगल्यांची माहिती मिळवली असावी. ज्या बंगल्यात फक्त वृद्ध दांपत्य राहतात तेथे चोरी करणे सोपे होईल त्या अनुषंगाने त्यांनी हा बंगला निवडला असावा. या बंगल्याच्या संरक्षक भिंती दोन ते अडीच मीटर उंचीच्या आहेत त्यामुळे त्यावरून उडी मारणे शक्य आहे. बंगल्याच्या गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाकडे प्रतिकार करण्यासाठी बंदूक नसल्याने त्याचा फायदा दरोडेखोरांनी उठविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT