Dead Dolphin|Ocean Pollution Canva
गोवा

सावधान! दक्षिण गोव्यात सतत आढळताहेत मृत मासे; विशेष मोहीम राबवण्याची गरज

Sea Pollution: ही समस्‍या दूर करण्‍यासाठी सरकार आणि वन्‍य विभाग काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Ocean Pollution

मडगाव: समुद्रातील वाढत्‍या प्रदूषणाचा परिणाम आता दक्षिण गोव्‍यावरही दिसू लागला आहे. दक्षिण गोव्‍यातील विविध किनाऱ्यावर डॉल्फिन आणि लहान देव मासे मृत अवस्थेत आढळत आहेत. चालू सप्‍टेंबर महिन्‍यात हे प्रमाण अधिकच वाढलेले असून त्‍यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.

ही समस्‍या दूर करण्‍यासाठी सरकार आणि वन्‍य विभाग काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वेळसांव समुद्र किनाऱ्यावर सोमवारी इंडो-पॅसिफिक फिनलेस पोरपोईज (एक प्रकारचा देव मासा) वाहून आलेला आढळला. त्याच दिवशी आगोंद समुद्र किनाऱ्यावर हिंद महासागरातील हंपबॅक डॉल्फिन माशाचे पिल्‍लूही मृत अवस्थेत आढळले.

तज्ज्ञांच्‍या मते जलप्रदूषण, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे किंवा अन्‍य नैसर्गिक कारणांमुळे हे प्रकार घडत असावेत. सागरी जिवांना भेडसावणारे धोके कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्‍याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

Goa Politics: 'आमच्या उमेदवारांची चिंता तुम्हाला का?' सत्ताधारी भाजपला आपने डिवचले

Viral Video: 19 मिनिटांचा 'तो' व्हायरल व्हिडिओ शेअर कराल तर याद राखा, पोलिसांनी दिली तंबी; काय आहे नेमकं प्रकरण?

'रोमिओ लेन'वर बुलडोझर ॲक्शन! मालक फरार होताच CM सावंतांचे फर्मान, पाडकाम पथके सज्ज; कोणत्याही क्षणी होणार भुईसपाट

SCROLL FOR NEXT