Goa CM Pramod Sawant On World Rabies Day 
गोवा

जागतिक रेबीज दिनानिमित्त CM सावंतांची मोठी घोषणा, गोव्यात 'या' जातीच्या श्वानांवर घालणार बंदी

जागतिक रेबीज दिनानिमित्त पणजी येथे आयोजित एका कार्यक्रमात सावंत बोलत होते.

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant On World Rabies Day: जागतिक रेबीत दिनानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठी घोषणा केली आहे. मानवांवर हल्ला करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या विविध जातांच्या श्वानांवर गोव्यात बंदी घातली जाईल अशी घोषणा सावंत यांनी केली आहे.

जागतिक रेबीज दिनानिमित्त पणजी येथे आयोजित एका कार्यक्रमात सावंत बोलत होते.

आपण प्राण्यांशी व्यवस्थित संवाद साधला तर ते ही आपले ऐकतात. प्राण्यांना आपण कुटुंबातील एक सदस्य म्हणून ट्रीट केले पाहिजे, काही लोकं फक्त शौक म्हणून कुत्रे पाळताता आणि वेळेवर त्यांचे लसीकरण करत नाहीत.

भटक्या कुत्र्यांना दगड मारु नयेत, असे तरुणांना मी आवाहन करतो. अलिकडेच लहान मुलांवर श्वान हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागावे. तसेच श्वानांचे लसीकरण करावे असे आवाहन सावंतांनी केले.

मानवांवर हल्ला करणाऱ्या काही आक्रमक प्रजातीच्या श्वानांना गोव्यात बंदी घातली जाणार आहे, असे सावंत म्हणाले.

2018 पासून गोव्यात रेबीजच्या एकही रूग्णाची नोंद नाही

रेबीज हद्दपार करणारे गोवा  देशातील पहिले राज्य ठरले असून, 2018 पासून राज्यात एकही रूग्णाची नोंद झालेली नाही. गोव्याने केलेल्या उपाययोजना पाहता राज्याने या रोगाला हद्दपार करण्यात यश मिळवले आहे.

जगभरात, या आजारामुळे दरवर्षी सुमारे 59 हजार लोकांचा मृत्यू होतो, त्यापैकी एक तृतीयांश मृत्यू भारतात होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT