गोवा खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित
गोवा खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित Dainik Gomantak
गोवा

गोवा खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित

दैनिक गोमन्तक

पाळी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी खाणी (Mining) पुन्हा सुरू करण्यासाठी खाण महामंडळामार्फत प्रयत्न सुरू केल्याने खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्यातील काही खाणी सुरू करण्यासाठी कागदोपत्री सोपस्कार केले जात असून खाण महामंडळाच्या माध्यमातून बंद खाणी सुरू झाल्या तर खाण अवलंबितांना तेवढाच दिलासा मिळेल, असे येथील ज्येष्ठ नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील खनिज खाणी सुरवातीला 2012 व त्यानंतर 2018 मध्ये बंद झाल्यानंतर अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. फक्त लीलावाचा तसेच स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची तेवढी वाहतूक करण्यात आली आहे; मात्र ही वाहतूक पुरेशी नसून बऱ्याच लोकांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे खाणी पूर्णपणे सुरू झाल्या तरच खाण अवलंबितांना दिलासा मिळणार असून त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी खाण अवलंबितांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातल्या असून त्यापूर्वी जर राज्य सरकारने बंद खाणी सुरू करण्यासाठी योग्य कार्यवाही केली तर ते रोजगार हिरावलेल्या खाण अवलंबितांना सोयिस्कर ठरणार असून मुख्यमंत्री हे स्वतः खाण भागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांच्याकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत, असे खाण अवलंबित म्हणाले.

विशेष म्हणजे, रोजंदारीवर काम करणाऱ्या सुमारे पाच हजार कामगारांना घरी बसवल्यानंतर त्यांच्या घरची स्थिती हलाखीची झाली आहे. याशिवाय अप्रत्यक्षरीत्या खाणीवर विसंबून असलेल्या बाजार भागातील दुकानदार, गॅरेजवाले, सुटे भागवाले, टायर पंक्चर आदी सर्वांना ठोकर बसली असून, खाणी सुरू झाल्या तर ही आस्थापने पुन्हा सुरू होणे शक्य असल्याचे मतही खाण अवलंबितांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

यंदाचा सिझन वाया घालवू नका

चतुर्थीनंतर खाणी सुरू होण्याची अपेक्षा खाण अवलंबितांना होती, मात्र ते झाले नाही. त्यामुळे हा सिझन तरी वाया जाता कामा नये. खाणी सुरू करण्यासाठी या सिझनमध्येच प्रयत्न व्हायला हवेत, आता मुख्यमंत्र्यांवरच सर्व काही निर्भर आहे, असे होंडा येथील दुकान व्यवसायिक विजेश जयराम नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT