Postcards from Goa | National Geographic channel
Postcards from Goa | National Geographic channel  National Geographic channel
गोवा

नॅशनल जिओग्राफिकवर गोव्याची डॉक्युमेंट्री; 'पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा' द्वारे उलगडणार अज्ञात पैलू

Pramod Yadav

Postcards from Goa: गोवा सुंदर समुद्रकिनारे, विविध उत्सव, स्वादिष्ट पाककृती आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्याचा समृद्ध वारसा नॅशनल जिओग्राफिक इंडिया 'पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा' नावाच्या आगामी माहितीपटातून उलघडणार आहे.

नॅट जिओ एक्सप्लोरर, साहसी क्रीडापटू आणि वन्यजीव चित्रपट निर्मात्या मलायका वाझ यांच्या नजरेतून हा प्रवास अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

25 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता नॅशनल जिओग्राफिकवर सुरू होणारी, ही चार भागांची मालिका गोव्यातील वन्यजीव, खाद्यपदार्थ आणि वैविध्यपूर्ण वारसा यांचा प्रवास उलगडणार आहे.

चित्तथरारक छायाचित्रणासह हा माहितीपट मलायकासह गोव्याच्या विभिन्न थरारक पैलूंचा मागोवा घेतला जाणार आहे. यात पश्चिम घाटाच्या विस्तीर्ण प्रदेशापासून ते चोडण बेटाच्या जैवविविध खारफुटीपर्यंत या किनारपट्टीच्या नंदनवनातील अज्ञात प्रदेश दाखवला जाणार आहे.

प्रेक्षकांना भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातील प्राचीन जंगलातील मार्गक्रमण आणि गोव्यातील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडणार आहे. या प्रवासात ऐतिहासिक अवशेष आणि सप्तकोटेश्वर मंदिर, बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि नमाजगाह यांसारख्या पूजनीय स्थळांचाही शोध घेतला जाणार आहे.

'पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा' ही अप्रतिम मालिका आहे. गोव्याचा आणि अलौकीक असा वैयक्तिक प्रवास आहे, असे राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले.

'गोव्याला अनेक अनपेक्षित पैलू आहेत. गोवा चैतन्यमय, तरूण आणि महत्त्वाकांक्षी आहे. गोव्याच्या संस्कृतीची विविधता, जैवविविधता, अज्ञात ठिकाणे याचे वैविध्यपूर्ण दृष्टीकोनातून टिपले आहेत, असे गोवा पर्यटन विभागाचे संचालक आणि गोवा पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT