members of the medical community Meet Margao police Dainik Gomantak
गोवा

Margao News: आरोपांची चाैकशी नि:पक्षपातीपणे करावी; डॉक्टरांची पोलिस उपअधीक्षकांकडे मागणी

आयएमएचे निवेदन : राज्यातील शेकडो डॉक्टरांची पोलिस उपअधीक्षकांकडे मागणी

Shreya Dewalkar

Margao Doctor Molestation Case: खारेबांद येथील ज्येष्ठ डॉक्टर डॉ. प्रकाश अवदी यांच्यावरील आरोपाची दखल घेत सोमवारी (ता.२१) इंडियन मेडिकल असोसिएशनने मडगावचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांना एक निवेदन सादर केले. हे प्रकरण संवेदनशील असून ते योग्यरीतीने तसेच नि:पक्षपातीपणे हाताळावे, अशी मागणी असोसिएशनने यावेळी केली.

राज्यातील शेकडो डॉक्टरांनी सोमवारी मडगावच्या पोलिस स्थानकावर एकत्र येत डॉ. अवदी यांना पाठिंबा दर्शविला. हे प्रकरण संपूर्ण डॉक्टर पेशाच्या प्रतिमेला डाग लावणारे असल्याचे डॉकक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांसोबतच वैद्यकीय प्रतिनिधी, फार्मसीचे मालक, सर्व वैद्यकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन धुमसकरही यावेळी उपस्थित होते.

हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळावे. केवळ पैसे उकळण्यासाठी हा बनाव केला असल्याने ज्या युवतीने डॉक्टरांची प्रतिमा मलीन केली व ज्या कोणी डॉक्टरांकडून पैशांची मागणी केली असेल त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मडगाव शाखेच्या अध्यक्ष डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी सांगितले. तसेच ज्या पद्धतीने पोलिस निरीक्षकाने डॉक्टरांना वागणूक दिली, त्यामुळे सर्व डॉक्टर व्यथित झाल्याचे यावेळी उपस्थित डॉक्टरांनी पोलिस उपअधीक्षकांना सांगितले.

अखेर क्लिनिक सुरू

तक्रार नोंद झाल्यावर पोलिसांनी डॉ. अवदी यांना क्लिनिक बंद ठेवायला लावले होते. मात्र, पोलिसांकडून संरक्षण मिळणार, असे आश्वासन मिळाल्यावर सोमवारी दुपारी त्यांनी क्लिनिक सुरू केले. यावेळी खारेबांध येथील नागरिक पाठिंबा देण्यासाठी हजर झाले होते.

डॉ. अवदींना पोलिस संरक्षण देणार

पोलिस निरीक्षकाने अवदी यांना गैरवागणूक दिली असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल तसेच हे प्रकरण दुसऱ्या पोलिसाकडे सोपविले जाईल. डॉ. अवदी यांना पोलिस संरक्षण दिले जाईल. अवदी यांनी आपले क्लिनिक सुरू करावे. या प्रकरणात जो दोषी आढळेल त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल, असे आश्र्वासन पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT