vishwa hindu parishad goa Dainik Gomantak
गोवा

St Xavier DNA Controversy: वेलिंगकर वादात आम्हाला गोवू नका! विश्व हिंदू परिषदेने स्पष्टच सांगितलं

Subhas Velingkar Controversy: राज्यात सध्या चाललेल्या वेलिंगकर वादात बजरंग दलाशी विश्व हिंदू परिषदेला गोवू नका, गोव्यात धार्मिक तेढ निर्माण न करता सर्वधर्मीयांनी गोव्याचे वैभव जपावे असे आवाहन माजी आमदार मोहन आमशेकर यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwa Hindu Parishad Goa About Subhas Velingkar Statement on SFX

फोंडा: राज्यात सध्या चाललेल्या वेलिंगकर वादात बजरंग दलाशी विश्व हिंदू परिषदेला गोवू नका, कारण प्रत्येकाची मते स्वतंत्र असून गोव्यात धार्मिक तेढ निर्माण न करता सर्वधर्मीयांनी एकसंध राहून गोव्याचे वैभव जपावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे राज्यमंत्री तथा माजी आमदार मोहन आमशेकर यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

यावेळी विहिंपचे उद्देश नाईक व राजेंद्र प्रभू उपस्थित होते. आमशेकर म्हणाले की, गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन बांधवांचे सख्य आहे. फार पूर्वीपासून एकमेकांच्या सणाला जाण्याची गोव्यात परंपरा आहे. पण एखाद्या विषयावरून गोव्यात अशांतता निर्माण करण्याचा आणि खूप छान चाललेल्या येथील विकासाला खीळ घालण्याचा व राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न होत आहे, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

आमशेकर म्हणाले की, पोर्तुगीज काळात मूळ हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले अशा लोकांना पुन्हा हिंदुत्ववादी होण्यासाठी परिषदेची दारे नेहमीच खुली असतील. सुभाष वेलिंगकर जे बोलले ते त्यांचे स्वतःचे मत आहे आणि अशाप्रकारची मागणी यापूर्वी झाली आहे. शेवटी हा न्याय प्रविष्ट विषय असून गोव्याची शांतता अबाधित ठेवणे एवढेच गोमंतकीयांचे कर्तव्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Lottery Winner: गणपती बाप्पा पावला...! सांगे गणेश मंडळाच्या लॉटरीत होमगार्ड महिलेला जॅकपॉट; 2 BHK फ्लॅटसह 35 लाखांची लागली लॉटरी

Asia Cup 2025: सर्वांच्या नजरा सूर्या-बुमराहकडे, पण 'हे' 3 खेळाडूच ठरू शकतात खरे 'गेम चेंजर'; भविष्यवाणी ठरणार का खरी?

PWD मंत्री दिगंबर कामत Action Mode मध्ये, बायणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास अचानक दिली भेट

मित्राच्या बर्थडे पार्टीवरुन परत येताना काळाने गाठले; फाईव्ह स्टार हॉटेलच्या फ्रंट ऑफिसरचा अपघाती मृत्यू

गोवा सरकारला 'सर्वोच्च' दणका; प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकासकाम करण्यास बंदी, SC ने 2 आठवड्यांत मागितला अहवाल

SCROLL FOR NEXT