Nilesh Cabral Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: ‘प्रीपेड’ वीज मीटरची सक्ती नको; नीलेश काब्राल

Nilesh Cabral: वीजबिल भरण्यात अनियमित आहेत किंवा बिलेच भरत नाहीत त्यांनाच प्रीपेड मीटर द्यावेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वीज खात्याने प्रीपेड मीटर बसवण्याची सरसकट सक्ती करू नये. जे वीज ग्राहक वीजबिल भरण्यात अनियमित आहेत किंवा बिलेच भरत नाहीत, त्यांनाच प्रीपेड मीटर द्यावेत, अशी मागणी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी आज विधानसभेत केली. वीज, नवीन व‌ अक्षय ऊर्जा खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते.

८५ टक्के वीज ग्राहक वेळेवर बिल भरतात. त्‍यामुळे वीज दरवाढीची मागणी करावी लागते. काही जणांमुळेच वीज दरवाढीचा भार सर्व ग्राहकांवर पडतो. त्यामुळे वीजबिले भरण्यात अनियमितपणा दाखवणाऱ्या ग्राहकांनाच प्रीपेड मीटर द्यावेत, म्हणजे ते आधी बिल भरतील आणि नंतर वीज वापरतील, असे काब्राल म्‍हणाले.

सरकारने विजेवरील वाहन अनुदान देण्याची संख्या केवळ सहाशे वाहनांपुरती मर्यादित का ठेवली आहे? चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी १०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर लागतो, असे आमदार काब्राल यांनी सांगितले.

अक्षय ऊर्जा व वीज खाते या दोन खात्यांत समन्वय नसल्यामुळे चार्जिंग स्टेशनसाठीचे अनेक अर्ज पडून आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यावे, असेही काब्राल म्‍हणाले.

भूमिगत वीजवाहिन्यांमुळे वीजगळती ११ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर येते. त्‍यामुळे राज्‍यासाठी भूमिगत वीजवाहिन्‍या खूपच गरजेच्‍या आहेत. सौरऊर्जानिर्मिती संयंत्रे घरावर बसवणाऱ्यांना वीजदरातही २५ ते ३० टक्के सवलत दिली पाहिजे.
नीलेश काब्राल, आमदार (कुडचडे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT