Lumpy Disease Dainik Gomantak
गोवा

Lumpy Skin Disease: परराज्यातून गोव्यात पशुधन आणू नका- जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

रोगाची वाढ होऊ नये यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून पशुधनाची वाहतूक करणाऱ्यास मनाई आदेश दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Lumpy Skin Disease: राज्यातील वाढत्या लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता आणि खबरदारीचा उपाय म्हणून 21 जानेवारीपासून परराज्यातून पशुधनाची वाहतूक करणाऱ्यास दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश दिला आहे.

दक्षिण गोव्यात गुरे आणि म्हशींसारख्या पशुधनाची वाहतूक आणि प्रवेश 21 जानेवारीपासून प्रतिबंधित असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

गोव्यात गुरांना लम्पी रोगाची लागण मोठ्या प्रमाणात व्हायला सुरवात झाली असून या रोगामुळे गुरे दगावण्याचे प्रकार होत असल्याने दूध उत्पादकांना अतोनात नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे सरकारने लंपी रोगाचा मुकाबला करताना युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी झाली.

दगावल्या गेलेल्या गुरांप्रती दूध उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेने केली होती.

या रोगाची वाढ होऊ नये यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून 21 जानेवारीपासून परराज्यातून पशुधनाची वाहतूक करणाऱ्यास दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arvind Kejriwal Liquor Scam: पणजीत 'आप'चा आनंदोत्सव, मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर जल्लोष

Police Transfer: आठ पोलिस अधीक्षक, तर तीन 'आयपीएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या; संतोष देसाई दक्षिण गोवा 'एसपी'

Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

IPL 2026 Schedule: आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल! 26 मार्च नव्हे तर 'या' तारखेपासून रंगणार क्रिकेटचा थरार

Crime News: वारंवार पैसे मागते, म्हणून पतीने पत्नीला संपविले! साळगावातील धक्कादायक घटनेने राज्य हादरले

SCROLL FOR NEXT