ट्रोजन डिमेलो Dainik Gomantak
गोवा

स्‍मृती इराणींच्या गोव्यातील रेस्टॉरंट परवान्याची चौकशी करा - डिमेलो

भाजप सरकार रेस्टॉरंटला जारी केलेल्या बेकायदेशीर परवान्याबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: स्मृती इराणी यांच्या फॅमिली रेस्टॉरंटच्‍या परवान्याची चौकशी करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या नातेवाईकांच्या रेस्टॉरंटला जारी केलेल्या बेकायदेशीर परवान्याबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी केला. पक्षाच्‍या येथील कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते समील वळवईकर आणि मारियानो रॉड्रिग्ज‍ उपस्‍थित होते.

डिमेलो पुढे म्‍हणाले, या रेस्टॉरंटला अन्न प्रशासनाचा परवाना मिळण्यापूर्वीच मद्य विक्रीचा परवाना दिला गेला. राज्‍य सरकार भाजपच्‍या नेत्‍यांसाठी कायदे धाब्‍यावर बसवून काहीही करायला तयार असते. नुकत्‍याच झालेल्‍या अधिवेशनात यावर चर्चा व्‍हायला हवी होती, पण असे झाले नाही. कारण विरोधकांनी सरकारसमोर गुडघे टेकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक गोमंतकीयांचे प्रश्‍न, समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. या रेस्‍टॉरंटला परवाना देताना कोणतेही सोपस्‍कार पूर्ण केले नसल्‍याचा आरोपही यावेळी डिमेलो यांनी केला. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

राज्‍यातील उद्योजकांना परवाने मिळवताना नाकीनऊ होतात, पण भाजपशी संबंधित नेते कोणत्‍याही आवश्यक कागदपत्रांशिवाय त्‍यांना हवे ते परवाने मिळवतात, अशी टीका वळवईकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT