गोवा

Goa News Update: नागाव-बार्देश येथे अपघात, सुदैवाने जीवीतहानी टळली; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News: दुधसागर पर्यटनासाठी जीटीडीसीने सुरू केलेली वॅबसायट हा ८ कोटींचा घोटाळा असल्याचा दुधसागर पर्यटन जीप असोसिएशनने गंभीर आरोप केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

नागाव-बार्देश येथे अपघात, सुदैवाने जीवीतहानी टळली!

नागाव-बार्देश येथून अपघाताची घटना समोर आली आहे. नागाव-बार्देश रस्त्यावर ठेवलेल्या वीज केबल रीलला कारची जोरदार धडक. हे रील अपघातांना आमंत्रण देत आहे. या अपघातात सुदैवाने जीवीतहानी टळली.

बेताळबाटी येथे गांज्यासह ओडिसाच्या तरुणास अटक

सुमीत मोहन दास (32, मूळ गाव ओडिशा) याला पोलिसांनी गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. 895 ग्रॅम गांजासह कोलवा पोलिसांनी संशयिताला बेताळबाटी येथून ताब्यात घेतले.

थिवीत प्रस्तावित खासगी विद्यापीठाच्या जागेवर आढळला बिबट्या

थिवी येथील खारगली वाडा येथे बिबट्याने शेळीवर हल्ला केला. सरकारच्या प्रस्तावित खाजगी विद्यापीठाच्या जागेवर बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले.

'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील एका संशयिताची आत्महत्या

संशयित शासकीय कर्मचारी श्रीधर सातारकर (फोंडा) याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. चौकशीनंतर बेपत्ता असलेला श्रीधर हा पूजा नाईकच्या सरकारी नोकरी घोटाळ्यामध्ये सहभागी होता.

दूधसागर जीप असोसिएशनचे उपोषण, घटनास्थळी वातावरण तंग

कुळेत दूधसागर असोसिएशनच्या साखळी उपोषणाच्या स्थळी वातावरण तंग झाले. उपोषणकर्ते आणि समर्थकांनी कुळे गावाच्या रस्त्यावर ठीय्या मांडला. उपजिल्हाधिकारी, पोलिस उप-अधिक्षक मोठ्या पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT