Surla Waterfall Dainik Gomantak
गोवा

Divya Rane : निसर्गसंपन्न सुर्ला गावात साकारणार हिल स्‍टेशन

आमदार दिव्या राणे : रोजगारनिर्मितीसाठी इको टुरिझम करणार विकसित

दैनिक गोमन्तक

Divya Rane : सत्तरीच्या घाटमाथ्यावरील सर्वात शेवटचे गाव अशी ओळख असणारे सुर्ला हे गाव त्याला लाभलेल्या नैसर्गिक अधिवासामुळे नितांत सुंदर आहे. येथील निसर्ग आणि भीमगड, म्हादई खोऱ्यातून येणारा थंडगार वारा, दऱ्या-खोऱ्यातून कोसळणारे धबधबे या सौंदर्याचे महत्त्व ओळखून वनखाते आणि वन विकास महामंडळाच्या वतीने सुर्ला गावाला ‘हिल स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येईल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी दिली आहे

सत्तरी तालुका तसा डोंगरदऱ्यांच्या अधिवासांचा भूभाग, त्यामुळे सोबतीला काहीसे कायमचे मागासलेपण इथे अनुभवास येते. इथल्या जमिनी मोठ्या प्रमाणात जंगलाचा अभयारण्यंचा भाग बनल्या आहेत. याशिवाय खासगी वनामुळेही येथील विकासावर मर्यादा आहेत. हे ओळखून आता वन विभागाने स्थानिकांना सामावून घेऊन त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी इको टुरिझम विकसित करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. यासाठी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी पुढाकार घेतला आहे.

संरक्षणाला प्राधान्य : वन विभागाने वनांच्या संरक्षणाला प्राधान्य देत स्थानिकांना सामावून घेण्यासाठी लुथरा यांच्यासारख्या ज्येष्ठ वन अधिकाऱ्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे

कॅम्प साईड उभारणार

सुर्ला गावाच्या पुढे डोंगर माथ्यावर मोठे पठार आहे. या पठाराचा उपयोग वनविभागाने करायचा ठरवला असून येथे कर्नाटकातील कबिनाच्या धर्तीवर मोठी ‘इको टुरिझम कॅम्प साइड’ उभारण्यात येईल. यामध्ये पर्यटकांसाठी जंगल सफारी, स्टॉल, पक्षनिरीक्षणासाठी टॉवर अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

स्थानिकांना रोजगार निर्मिती

देशभरातल्या अभयारण्यांमध्ये स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीचे विविध प्रकल्प राबवण्यात येतात. त्याच धर्तीवर या परिसरातील स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा या हेतूने वन गाईड व अन्य सेवा सुविधा देण्यासाठी स्थानिकांना या प्रकल्पात सामावून घेण्यात येणार आहे. त्याचा फायदा येथील रोजगार निर्मितीसाठी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT