Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: वाळपई येथे गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप

शिबिरातील लाभार्थींना लाभ: आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते 109 जणांना वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

केरी पंचायत क्षेत्रात आयोजिलेल्या मेगा वैद्यकीय शिबिरातील लाभार्थ्यांना पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते मोफत चष्मांचे वाटप वाळपई येथे आमदार राणे यांच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर केरी सरपंच दिक्षा गावस, वाळपई आरोग्य केंद्राचे डाॅ. वैभव गाडगीळ, अकीब शेख उपस्थित होते. यावेळी केरी पंचायत क्षेत्रातील 109 जणांंना आमदार डाॅ. राणे यांच्या हस्ते चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

आमदार डाॅ. राणे म्हणाल्या, सत्तरीतील विविध भागांत वैद्यकीय शिबिर आयोजिली आहेत. या शिबिरांतून नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे आरोग्य तपासणी केली जात आहे. अशा वैद्यकीय शिबिरांतून गरजूंना चांगली सेवा प्राप्त होत असते.

आगामी एक वर्षाच्या काळात पर्ये मतदारसंघाचा विकास कशा प्रकारे करता येईल याकडे आपले लक्ष आहे. टप्याटप्याने उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यात येतील, असेही डॉ. राणे यांनी सांगितले. स्वागत व सूत्रसंचालन डाॅ. वैभव गाडगीळ यांनी केले. दिक्षा गावस यांनी आभार मानले.

केरी येथे झालेल्या वैद्यकीय शिबिरात डोळे तपासलेल्या रुग्णांना हे चष्मे देण्यात आले आहेत. चष्मे उत्कृष्ट दर्जाचे असून चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

गरजूंना ही सेवा देताना समाधान वाटत आहे. सत्तरीत अशा प्रकारची आरोग्य तपासणी वेळोवेळी केली जात आहे. गरजूंनी अशा वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. - डॉ. दिव्या राणे, आमदार, पर्ये

चांगली सेवा देण्याचा प्रयत्न

सत्तरी तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा तसेच विकास कामांना गती देण्याचे काम आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे चांगल्या प्रकारे करत आहेत.

गावचा विकास, शैक्षणिक सुविधा, तसेच विकासकामांना गती देऊन चांगली सेवा प्रत्येकाच्या घरी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सत्तरीच्या जनतेने एकत्र येऊन सहकार्य करण्याची गरज आहे, असे डॉ. राणे म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT