CM Pramod Sawant, E bike Dainik Gomantak
गोवा

Goa News: ३२ दिव्यांगांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक दुचाकींचे वाटप

Hindustan Petroleum Corporation Limited: सामाजिक बांधिलकी उपक्रमाखाली दिव्यांग व्यक्तींसाठी निओ फ्लाय आणि निओ बोल्ट कंपनीच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे वाटप

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यभरातील दिव्यांगाचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच दिव्यांगांना मोफत उपकरणे देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभा संकूल परिसरात सांगितले. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाखाली दिव्यांग व्यक्तींसाठी निओ फ्लाय आणि निओ बोल्ट कंपनीच्या एकूण ३२ इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे वाटप केल्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी संजय स्कूल फॉर स्पेशल एज्युकेशन सेंटरमधील विशेष विद्यार्थ्यांना आवाजाची सुविधा असलेल्या १२ टॅब्लेटचे वाटप केले.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी एचपीसीएलच्या पुढाकाराबद्दल पेट्रोलियमचे आभार व्यक्त केले.

यावेळी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, आमदार डॉ. दिव्या राणे, चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, दिगंबर कामत, दाजी साळकर, समाज कल्याण सचिव ई. वल्लवन, अपंग व्यक्तींसाठाचे राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि गोवा राज्य अपंग व्यक्ती आयुक्तालयाचे सचिव ताहा हाझिक, कंपनीचे अधिकारी राजीव गोयल, शशांक तिवारी, आणि श्रुती पालन उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT