रमेश तवडकर Dainik Gomantak
गोवा

पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर काणकोणात असंतोष

भाजप कार्यकर्ते नाराज: संयम बाळगण्याचे तवडकर यांचे आवाहन

दैनिक गोमन्तक

आगोंद: गोवा राज्याच्या सभापतीपदाविषयी काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांना पक्षनेतृत्वाने राजी करून गेले काही दिवस चाललेल्या चर्चेला आज (रविवारी) विराम मिळाला खरा. मात्र, सायंकाळी चावडी येथील कार्यालयात तवडकर यांना कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका पटवून देताना नाकीनऊ आले.

यावेळी काणकोण मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दक्षिण गोव्यातील एकूण 4 मतदारसंघात प्रभाव पाडलेले व एकूणच भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर 4 वेळा निवडून आलेल्या 20 वीसपैकी सर्वांत ज्येष्ठ भाजपा आमदार ठरलेल्या आमदाराला मंत्रिपदापासून डावलले गेल्याने हा दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याचे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करून पक्षाच्या निर्णयावर कठोर टीका कली.

जबाबदारी स्वीकारण्यास तयार...

काणकोण मतदारसंघ किंवा अन्य कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या या निर्णयावर किंचितही शंका बाळगू नये. पक्षाने राज्याच्या सभापतीपदासारख्या उच्च पदावर जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे त्या पदावर केलेल्या निवडीचा मला अभिमान आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यात मी सर्वतोपरी यशस्वी होईन. कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असे तवडकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. रात्री उशिरापर्यंत प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार तवडकर जराही विचलित झाले नाहीत.

दक्षिण गोव्यावर अन्याय

एकूण मंत्रिपदावर पैकी सांगे, सावर्डे, कुंकळ्ळी व काणकोण मतदारसंघाला मंत्रिपद न दिल्यास दक्षिण गोव्यातील बहुतेक सर्व मतदारांवर हा अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया भाजपा प्रमुख कार्यकर्त्यांकडून यावेळी व व्यक्त करण्यात आल्या. आमदार तवडकर हे ३००० पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी ठरलेले आमदार असून, आज त्यांची स्थिती पंख छाटलेल्या पक्ष्याप्रमाणे केली असल्याचे मत काणकोणचे नाट्य कलाकार नारायण देसाई, आगोंद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष किरण नाईक गावकर यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT