Disputes between two groups Dainik Gomantak
गोवा

बेतूलात दोन गटांत वाद; दर्ग्याला टाळे

उपजिल्हाधिकाऱ्यांची कारवाई: तोडग्यासाठी 31 मे रोजी बैठक

दैनिक गोमन्तक

केपे: बेतूल येथील दर्ग्याचा उरूस साजरा करण्यावरून दोन गटात तणाव उद्‍भवल्याने यावर तोडगा काढण्यासाठी दि. 31 रोजी केपे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी बैठक बोलावली आहे. तोपर्यंत दर्ग्याला टाळे ठोकण्यात आले आहे.

रमजान ईद झाल्यानंतर दहा दिवसांनी येथे संदल हा कार्यक्रम करण्यात येतो व दुसऱ्या दिवशी उरूस साजरा करण्यात येतो, पण ( रात्री दि.12 रोजी ) संदल साजरा करण्याच्या दिवशी एका गटाने दिलेल्या वेळेच्या आधीच हा कार्यक्रम करून दर्ग्याला टाळे ठोकल्याने दुसऱ्या गटाला हा कार्यक्रम साजरा करण्यास आडकाठी आणल्याने बेतुल येथे दोन्ही गटामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी केपेचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर व मामलेदार प्रताप देसाई यांनी बेतुल येथे जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती व याविषयी आज दि.13 रोजी केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही गटांची बैठक बोलावण्यात आली होती, पण यावेळी एका गटाचे सदस्य न आल्याने सदर बैठक आता दि. 31 मे रोजी ठेवली आली आहे, असे धायगोडकर यांनी सांगितले.

दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दर्ग्याला टाळे लावले असून आता तसाच उरूस साजरा करण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले. एकोपा बिघडवण्याचे काम दुसरा गट करीत असल्याचे शेख यांनी सांगितले.

‘संदल’ वेळेआधीच उरकल्याने वाद

बेतुल येथील शेख जाहिद यांनी सांगितले,की दर्ग्याविषयी दोन गटातील सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. दर वर्षी संदल हा कार्यक्रम रात्री 10 वाजता करण्यात येतो. पण यावर्षी दुसऱ्या गटाने हा कार्यक्रम 9 वा. उरकून दर्ग्याला कुलूप ठोकल्याने वाद निर्माण झाला. बेतूल गावातील मुस्लिम बांधवांना हा कार्यक्रम करण्यापासून रोखण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जमिनी लाटण्याचं खापर केवळ देवस्थानांवरच का? पोर्तुगीज दडपशाहीच्या बाजूचा विसर पडला की काय?

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण बॉम्बस्फोट; 8 ठार, 35 हून अधिक जखमी VIDEO

Goa Heat Wave: उन्हाचा 'कडाका' अन् घामाच्या 'धारा'; मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिक उकाड्याने हैराण, कमाल तापमान 36 अंशांवर

Sattari Monsoon Preparedness: पावसाळ्यापूर्वी सत्तरी प्रशासन सज्ज व्यापक पूर्वतयारी; 15 मेपासून नियंत्रण कक्ष 24 तास सुरू

Minor Marriage Case: संतापजनक! 11-12 वर्षांच्या मुलांचं जबरदस्ती लावलं लग्न; गावगुंडांनी मुलाचं डोकं मुंडवून दिली 'तालिबानी' शिक्षा

SCROLL FOR NEXT