dispute over footpath in Bagwada was settled Dainik Gomantak
गोवा

बागवाडातील पायवाटेचा वाद मिटला

19 वर्षांपासून प्रश्‍न ऐरणीवर: उपजिल्हाधिकारी, कंपनी व पंचायत बैठकीत तोडगा

दैनिक गोमन्तक

मोरजी: बागवाडा-मोरजी येथील पारंपरिक पायवाटेचा प्रश्‍न गेल्या 19 वर्षांपासून ऐरणीवर होता. पेडणे उपजिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त ताबा घेतलेल्या दीपक वायंगणकर यांच्या शिष्टाईमुळे तसेच कंपनीचे प्रतिनिधी व पंचायत मंडळ यांच्या संयुक्त चर्चेतून पारंपरिक पायवाटेवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला.

वायंगणकर यांच्यासह सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच विलास मोरजे, पवन मोरजे, प्रकाश शिरोडकर, मुकेश गडेकर तसेच ॲड. प्रसाद शहापूरकर, भक्तदास बागकर, नीलेश बागकर, कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन कंपनीने स्थानिक ग्रामस्थांना पारंपरिक पायवाट देण्यास मंजुरी दिली. पायवाटेचा प्रश्‍न सुटल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या पायवाटेवर तोडगा काढण्यासाठी सलग तीन दिवस संयुक्त बैठक आयोजित केली होती. 27 रोजीच्या तिसऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय झाला.

कंपनीने स्थानिकांना पारंपरिक पायवाट देण्याचे मान्य केल्याने ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला. ही पायवाट स्थानिकांना मिळावी यासाठी स्थानिक पंचसदस्य प्रकाश शिरोडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार मोरजी पंचायत क्षेत्रातील शापोरा नदीकाठी बागवाडा या ठिकाणी स्थानिक जमीन मालकांकडून एका दिल्लीतील हॉटेल कंपनीने जमीन विकत घेतली होती. या जमिनीतच

बागवाडा- मोरजी येथील रहिवाशांची पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीची जागा शिवाय याच जागेतून एकूण पंधरा घरांना पारंपरिक पायवाट होती. ती पायवाट अडवण्याचा प्रयत्न कंपनीने केला होता. स्थानिक महिलांनी याबाबत जाब विचारला असता कंपनीने त्या ठिकाणी महिला बाउन्सर तैनात केल्या होत्या. त्या बाउन्सर्सकडून स्थानिक महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. यासंदर्भात पेडणे पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. हे प्रकरण तात्पुरते मिटवण्यासाठी स्थानिक पंचायतीने पुढाकार घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT