मृत देह Dainik Gomantak
गोवा

Goa: अंत्यसंस्कार कुठे करायचा यावरून मांद्रेत वाद; मरणानंतरही संपेनात यातना

आपल्या वाड्यातील स्मशानभूमीत दुसऱ्या ठिकाणच्या मृतदेहाला अग्नी देण्यास मज्जाव करण्यात आल्याने येथे मोठा तणावही निर्माण झाला होता.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मनुष्याचे जीवन क्षणभंगुर असल्याची जाणीव कोरोनाने करून दिली. असे असले तरी काही संकुचित बुद्धीच्या लोकांना त्याची जाण नाही. मांद्रेत अशीच घटना सोमवारी पाहायला मिळाली. एका 86 वर्षांच्या व्यक्तीचे रविवारी रात्री 12 वाजता निधन झाले होते. त्याला 14 तास उलटल्यानंतरही त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. (Dispute in the Mandrem on the issue of where to perform the funeral)

अंत्यविधी कुठे करायचा यावरून वाद पेटला होता. आपल्या वाड्यातील स्मशानभूमीत दुसऱ्या ठिकाणच्या मृतदेहाला अग्नी देण्यास मज्जाव करण्यात आल्याने येथे मोठा तणावही निर्माण झाला होता. अखेर वाद निवळल्यानंतर पंचायतीच्या मालकीच्या जागेत सायंकाळी 4 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संयुक्त मामलेदार, पोलिस उपस्थित होते. मांद्रे ग्रामपंचायतीवर सोमवारी सकाळी स्थानिकांनी धडक देत तिथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्यानंतर हे प्रकरण आमदार दयानंद सोपटे यांच्यापर्यंत गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिसही दाखल झाले. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यानंतरही हा वाद मिटला नव्हता.

काय आहे प्रकरण?

अलीकडेच मांद्रेतील जमिनींना मोठी मागणी वाढलीय. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार होणाऱ्या जमीनमालकांनी कुंपण घालून अडवल्या आहेत. तिथे अंत्यविधी करण्यास मज्जाव केला जातो. मोरजी गावात असाच प्रकार घडला होता त्यावेळी तेथील लोकांनी मृतदेह पणजीत आणून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आणला होता. सार्वजनिक स्मशानभूमीचा विषय खूप महत्त्वाचा असूनही सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT