Vishwajeet Rane And Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

राणे-लोबोंत पुन्‍हा जुंपली!

व्‍यवसाय संपवण्‍याचा डाव : लोबो; कायदेशीर कारवाई : राणे

दैनिक गोमन्तक

पणजी: नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे आपल्‍याला वैयक्तिक लक्ष्‍य करत आपला व्‍यवसाय संपविण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍याचा आरोप विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केला आहे. याविरोधात न्‍यायालयात दाद मागणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली आहे. तर, आपण कायदेशीर कारवाई करीत असल्‍याचे राणे यांनी म्‍हटल्‍याने या दोघांमध्‍ये पुन्‍हा एकदा जुंपली आहे.

(Dispute again between Vishwajeet Rane and Michael Lobo )

लोबो म्‍हणाले की, मंत्री राणे हुकूमशाही राजासारखे वागत असून इतरांना प्रामुख्‍याने कर्मचाऱ्यांना गुलामाप्रमाणे वागवत आहेत. त्‍यांची या दादागिरीला मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लगाम घालावा, अशी विनंती आपण केली आहे. कळंगुट, बागा परिसरातील आपल्‍या पाच हॉटेल्‍सची अन्न आणि औषध प्रशासनाकडून सतावणूक सुरू आहे. नोटिसा देणे, भेटायला बोलाविणे आणि प्रत्‍यक्ष हॉटेलमध्‍ये कारवाई करणे अशी छळवणूक सुरू आहे. हा प्रकार व्‍यावसायिकांसाठी आणि नव्‍याने गुंतवणूक करू पाहणाऱ्यांकरिता त्रासदायक आहे.

आपले सर्व व्‍यवसाय पत्‍नी दिलायला लोबो यांच्‍या नावे आहेत आणि ते 20 वर्षांहून अधिक जुने आणि कायदेशीर परवानाधारक आहेत. ही छळवणूक थांबली नाही तर आपण न्‍यायालयात जाणार असल्‍याची माहिती लोबो यांनी दिली.

मायकल लोबो राजकारणात येण्‍यापूर्वीपासून आपण कळंगुट, बागा परिसरात वेगवेगळे व्‍यवसाय करत आहे. यापैकी हॉटेल व्‍यवसाय हा एक आहे. या सर्व व्‍यवसायांचे रितसर परवाने आपण यापूर्वीच घेतलेले आहेत. केवळ मायकल लोबो यांना विरोध म्‍हणून मंत्री राणे यांनी असे त्रास देणे चालू केले आहे. यासाठीच आपण आज मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली.

- दिलायला लोबो, आमदार शिवोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT