‘मेक अप विश फाऊंडेशन' Dainik Gomantak
गोवा

Goa News: व्याधीग्रस्त मुलांनी लुटला ‘रोझ डे’चा आनंद

Goa News: ‘मेक अप विश फाऊंडेशन’तर्फे सिप्ला फाऊंडेशनच्या सहकार्याने कालापूर येथील रुग्णाश्रयात ‘रोझ डे’चे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Goa News: ‘मेक अप विश फाऊंडेशन’तर्फे सिप्ला फाऊंडेशनच्या सहकार्याने कालापूर येथील रुग्णाश्रयात ‘रोझ डे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याधीग्रस्त मुलांचे मनोरंजन करून त्यांना आनंदात सहभागी करून घेण्यात आले.

जागतिक कर्करोग जागृती महिन्यानिमित्त या खास कार्यक्रमात पालकांसह मुलांनी भाग घेतला. आजारी मुलांमध्ये उत्साह आणि धैर्य टिकून राहावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. पालकांनी मुलांसह उपस्थितांची आपुलकी आणि स्नेह अनुभवला.

सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी शंखवाळकर यांनी मुलांना कागदी कात्रणांतून कोलाज करण्याची कला शिकवली. त्याचा मनमुराद आनंद मुलांनी लुटला.

सिप्ला कंपनीचे कर्मचारी आणि डॉक्टरांनी यावेळी मुलांना चार्ट पेपरवर कला साकारण्यासाठी सहकार्य केले. मुलांमधील कलात्मक गुण त्यांच्या कलाकृतीतून दिसून आले.

यावेळी डॉ. लोरेन डिसा, डॉ. अफिफा के.के., डॉ. समृद्धी मडकईकर तसेच रुग्णाश्रय साहाय्यता होम नर्सिंगच्या प्रमुख शांता म्हांबरे आणि सिप्ला कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT