Benaulim panchayat Dainik Gomantak
गोवा

बाणावलीच्या खास सभेत महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा

1 मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले

दैनिक गोमन्तक

सासष्टी: बाणावली पंचायतीत बोलावण्यात आलेल्या खास सभेत महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. पंचायतीने बाणावलीवासीयांच्या भावना समजून त्यांच्याकडून लोकविरोधी प्रश्‍नांवरून जे आंदोलन व विरोध सुरू आहे त्यास पाठिंबा देण्यात यावा, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर साळ नदीत मासे पैदास होण्याची काही ठिकाणे आहेत. जर कोलवा एसटीपी प्लांटचे पाणी त्यात सोडले तर माशांची पैदास होण्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

यासंदर्भात उपसरपंच नीलेश प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, आपण या बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. ही खास सभा लोकांच्या भावना व त्यांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी बोलावण्यात आली होती. 1 मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत लोकांच्या प्रश्‍नासंबंधी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

यावेळी स्वच्छ पाणी व परिसरातील स्वच्छतेबद्दल मुद्दे मांडण्यात आले. पुढील दोन वर्षांसाठी आम्ही साळ नदीचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे मत माजी सरपंच ऱॉयला फर्नांडिस यांनी व्यक्त केले. कोलवा येथील एसटीपी प्लांटचे पाणी साळ नदीत सोडण्यात विरोध असल्याचे फर्नांडिस म्हणाल्या. अक्षय उर्जेबद्दल बोलताना पंचायतीने सौरऊर्जेला प्रोत्साहन व प्राधान्य द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेताच्या रक्षणासाठी आम्ही पश्र्चिम बगल रस्ता स्टिल्टवर बांधावा म्हणून आग्रही आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

पंचायतीने प्लॅस्टिक वापरावर बंदी घालावी, तसेच येथील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जैवविविधतेचे रक्षण होणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. याबाबतीत पंचायतीने जागरूक राहावे व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT